Saturday, October 1, 2022

सुभाष पाळेकर या प्रश्नांची उत्तरे देतील का?

स्वप्न पहाणारे सर्वच गणित स्वप्नात करतात..आज शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक वातावरणात स्थानिक पिकांचे रसायनमुक्त पध्दतीने चांगल्या प्रकारचे उत्पादन कसे येईल याविषयी मार्गदर्शन अपेक्षित असताना स्वप्नांचा भूलभूलैया कष्टकऱ्यांना दाखवणे म्हणजे शुध्द फसवणूक आहे, यापेक्षा मॉडेलकर्त्यांनी स्वतःच्या जमीनीत निदान दहा गुंठ्यात १०% पाणी व १०% वीज हे यांच ब्रीदवाक्य यावर हे मॉडेल का नाही उभे करत. प्रत्येक प्रयोगासाठी शेतकऱ्याचाच बळी का दिला जातो. तरी हा पथदर्शक प्रकल्प स्वतः उभारून मगच इतरांना खरे पथदर्शक व्हा आणि पुस्तके व सीडी विक्रीतून कोण लुटारू आहे हे आत्ता जनता जनार्दन ओळखू लागली आहे. आणि टींगलटवाळी तर होणारच कधीही, कुठलाही प्रयोग न करता शेतकऱ्याच्या माथी हे कुचकामी न केलेले प्रयोग मारतात. कसे शक्य आहे, याचा सारासार विचार शेतकऱ्यांनी करावा…

नवनिर्मान काय फक्त शेतकऱ्यांनीच करायच का..?
लावा ना एका तर मुलाला या पथदर्शी प्रयोगाच्या प्रत्यक्षातील कामाला. शब्द प्रयोग पहा व विचार करा… नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या धाडशी स्वप्नाळू नफ्या तोट्याचा विचार न करता झोकून देणाऱ्या तरूण शेतकऱ्यांसाठी याचाच अर्थ शेवटी आत्महत्या करायची का..? तोटा झाल्यास भरून देणार का..? पाऊस नाही,पाणी नाही अशी सत्य परिस्थिती असताना कशासाठी हा भूलभूलैया..?? नोकरी करून समाधानी असणाऱ्याला काहीबाही स्वप्न दाखवून कमावत्या मुलाला गावाकडे खेचून आणायचे, खात्री आहे तर तसे लिहून द्यावे, फेल गेल्यास तुमचे ठरलेलेच आहे. तंत्र योग्य राबवले नसाल हा ही दोष त्या तरूणावर मारून आपण मोकळे आणि या स्वप्नातील बंगल्याचे स्वप्न साकारायला सर्व कुटुंबाची संम्मती मिळवायची हि पण त्या तरूणानेच. म्हणजे नुकसान झाले तर तो तरूण जाणे व त्याचे कुटुंब. वाह व्वा. आणि याबाबत जाहीरपणे सांगता. सर्व अडचणींचा विचार करून प्रारूप ठरवलेले आहातच तर कुणी शेतकरी हे तुमचे स्वप्नाळू मॉडेल उभे करू इच्छितो त्याला सर्व तंतोतंत राबवल्यास कमीत कमी इतके उत्पंन्न मिळेल याविषयी स्टँपवर लिहून द्या. सरकारवर टीका करण्यापेक्षा पहिले स्वतः त्यावर गंभीरपणे विचार करा. जिथ जंगली प्राणी नुकसान करतात असे म्हणता, तिथ तुमचाच निष्कर्ष आहे की जंगलात मानवाने कुठलाही हस्तक्षेप न करता विपुल प्रमाणात फळे, फुले ,वगैरे सगळे लदबदलेले असताना हे जंगली प्राणी कशाला हो मानवाने बनवलेल्या विविध पिकांचे नुकसान करण्यासाठी येतील..?


सगळ्या फळ झाडांची खिचडी बनवून सगळाच रगडा करून वेगवेगळी नावे सांगून टाकलेले जाळे म्हणजेच स्नप्नातील भूलभूलैया. पुढील काळात कँन्सर पासून वाचवणाऱ्या बियांच्या द्राक्षाची लागवड करायची म्हणता, मग आत्तापर्यंत नपुंसक सिडलेस द्राक्षाच्या ठिकाणी शिवारफेऱ्या व त्या द्राक्ष उत्पादकांचा उदोउदो कुणी केला..? गेल्या २५ वर्षात नैसर्गिक शेतीचा प्रचार करणाऱ्याला बध्दकोष्ट आजार व्हायलाच नकोत.. पण हे सर्व घडलेच ना. इथ आत्ता काय खायचे व काय पिकवायचे व कसे जगायचे हा प्रश्न असताना दोन ,तिनशे वर्षाच्या नारळाविषयी सांगता, कुठ व कधी हा शोध लावला…?

खिचडी मॉडेल कसे शक्य आहे..? हे विस्ताराने कधी व कुठे तपासले.? त्यातच सर्व कडधान्य मिक्स करून पेरायची तर काढणी कशी करता येईल..? शोधून शोधून वेगवेगळे कडधान्य काढेपर्यंत नाकीनऊ येतील त्या शेतकऱ्याला. बर हे सर्व खिचडी मॉडेल करायला खर्चही किती येतो ते ही विस्ताराने सांगा,
नाहीतर अगोदरच्या एकरी १२ लाखाच्या मॉडेलसाठी तरूण भूललेल्या शेतकऱ्यांचे लाखो रूपये खर्ची पडले आहेत आणि आपल्यासारख्या झिरो बजेटची संकल्पना असणाऱ्या तज्ञाने तरी फार खर्चिक मॉडेल लोकांच्या माथी मारणे पटत नाही. काहीही संकलन करायचे, व शेतकऱ्याच्या माथी मारायचे हे आत्ता बंद करा. पुन्हा एकवेळ विनंती शेतकऱ्याला स्वप्ने दाखवू नका.. स्वतः प्रयोग सिध्द करा मगच इतरांना सांगा.

लेखक-अनामिक

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची