एक युवा शेतकरी म्हणून अशी आशा व्यक्त करतो की आपले नवीन सरकार, शेतकऱ्यांना नुसते ‘package’ न देता ‘ताकद’ देईल. अत्ता पर्यंत झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवावर नुसत्या राजकारणाच्या जागी, अखंड देशात एक सुंदर असे उदाहरण देण्याची संधी आहे ही.
कोणतेही धोरण ठरवताना ह्या बाबींचा विचार केला जावा ही विनंती.
१) सरसकट निर्णय न घेता, महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणच्या जैव विविधता, वातावरण आणि तिकडल्या शेती परंपरेचा विचार करून निर्णय घेण्यात यावे. कारण हे तर सगळ्यांना माहितीच आहे की कोकणातली शेती आणि पश्चिम महाराष्ट्रातली शेती ह्यात जमीन असमान चा फरक आहे. त्याच बरोबर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पीक पद्धती ह्या वेग वेगळ्या आहेत. मग इथे लागू होणारे शेतीचे निकष हे सारखेच कसे असू शकतात.
२) ठीक ठिकाणच्या स्थानिक प्रजाती व पारंपरिक शेती पद्धतींवर जोर देऊन शेतकऱ्यांना त्या अवलंबण्यास प्रवृत्त करावे. आणि त्याच्या जोडीला तंत्रज्ञान कसे वापरता येईल ह्याचा विचार करणे.
३) नैसर्गिक आपत्ती हा आता नेहमीचा आणि दरवर्षीचा विषय राहणार आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यासाठी काय उपाय योजना करता येतील ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. सर्वात पहिले बदलत्या हवामानाच्या दृष्टिकोनातून पीकपद्धती मध्ये कोणत्या प्रकारचे बदल करण्याची गरज आहे ह्यावर तातडीने काम करणे अत्यंत गरचेचे आहे.
४) ह्यासाठी स्थानिक कृषी विद्यापीठांचा पुरेपूर आणि योग्य तो वापर करून त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार ‘practical’ आणि ‘vocational’ पद्धतीने शेती चा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे. अत्ता ह्या गोष्टी होत नाहीत असं नाही पण सुधारणा नक्की होऊ शकते. त्याच बरोबर शेती बद्दलची किमान जागरूकता ही शालेय शिक्षणापासून भावी पिढीमध्ये करण्यात यावी. शहरीकरण, information-technology सोबत आपल्यासाठी शेती ही तितकीच महत्वाची आहे हे भावी पिढीला सांगणे खूप महत्वाचे आहे.
५) पशुपालन हा शेतीचा एक अविभाज्य घटक आहे. त्यावर योग्य रीतीने जोर देणे हे अनिवार्य आहे. सध्या महाराष्ट्रात पशु पालनापासून लोक परावृत्त होत आहेत. त्याचे सर्वात मोठे करण आहे चाऱ्यावर होणारा खर्च आणि मग त्यामुळे उत्पन्न खर्चात होणारी वाढ. ह्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. दुष्काळाच्या वेळेत चारा छावण्यांची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे!
६) आणि हे सगळे करत असताना, उत्पन्न खर्चावर नियंत्रण कसे राखता येईल ह्याचे समजून उमजून केलेले विश्लेषण. आपण शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचा विचार करताना, तो करत असलेला खर्च दुर्लक्ष करून कसे चालेल. शेती न परवडण्यासारखी होण्यामागे सर्वात मोठा मुद्दा हाच आहे.कारण , जर खर्चच मुळात कमी केला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात नक्की मदत होईल.
७) आणि सर्वात शेवटी एक वास्तववादी बाजारपेठ ज्यात वास्तवाला धरून शेतमालाचे मोजमाप आणि मूल्यांकन होईल. व्यापारींनी सुद्धा नक्की पैसे कमवायला हवे कारण शेवटी तेसुद्धा ह्या commercial-chain चा अविभाज्य घटक आहेत. पण शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही ह्याकडे सुद्धा लक्ष्य गेले पाहिजे.
सगळ्यांना एकच सांगणं आहे आणि विशेषतः तरुण मित्रांना, शेतीची कास धरली तर आपल्याला मरण नाही. स्व-अनुभवातून सांगतोय ‘sky is the limit’… गरज आहे ती फक्त योग्य त्या push ची.
लक्ष्यात ठेवा शेवटी शेती वाचली तर शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तरच देश वाचेल.
सुमित भोसले
कॅलिफोर्निया३० फार्म्स
तळवडे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.
‘कृषिग्राम’ ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी समूहाचा एक कार्यकर्ता.
Medicine che bhav Kami kra
Shetkri mulala job chi sandhi dya