सध्या सोशलमिडीयावर धंदा कसा करायचा हे शिकवणारे बरेच चॅनेल्स आहेत त्यासोबत धंदा शिकवणारे कोच देखील. माणसाने नोकरी न करता छोटामोठा धंदा करावा असं ठासून सांगितलं जातं. नोकरी म्हणजे दुसऱ्याची गुलामी आणि धंदा म्हणजे स्वतःच साम्राज्य अशा अविर्भावात हि मंडळी लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यात यशस्वी होतात. नवखे तरुण या भूलथापांना बळी पडून धंद्यात उतरतात. इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट, सेल, पर्चेस, मार्केटिंग याच गणित न जुळल्यामुळे बरेच उद्योग काही काळाने बंद पडतात किंवा त्यापटीत चालत नाहीत.
माझा एक अनुभव सांगतो मी नोकरीही केली आहे आणि व्यवसायही. दोन्हीची तुलना केली तर नोकरीपेक्षा धंदा करणे खूप अवघड गोष्ट आहे. नोकरीमध्ये ठराविक वेळेत तुम्हाला काम करावे लागते. तिथं तुम्हाला इकॉनामिकल रिस्क नसते. तुम्ही तुमचे बेस्ट दिलात कि प्रोमोशन, इन्सेन्टिव्ह या गोष्टी मिळत जातात. अर्थात नोकरीत देखील तुम्हाला एफर्ट द्यावेच लागतात, डोकं लावावं लागतं तरच तिथंही प्रगती आहे.
धंद्यात वेळ बघून चालत नाही. धंद्यात आर्थिक रिस्क खूप आहे. मानसिक ताण तणाव व्यवसायात खूप आहे. तुम्ही अवाक जावक विचारात न घेता खर्च करायला गेलात तर एखाद्या दिवशी तुमचं दुकान गुंडाळलेले असेल. व्यवसाय 4 फेज मधून जातो. सिलेक्शन, व्यवसाय उभा करणे,व्यवसाय चालवणे सेट करणे,आणि व्यवसाय वाढवणे. या प्रत्येक फेजमध्ये तुम्हाला अंगावर रिस्क घेऊनच काम करावं लागत. तुमच्या नवीन संकल्पना व्यवसायात उतराव्या लागतात. मार्केटची गरज बघून काम करावं लागतं तेव्हा कुठं व्यवसाय फुलतो. या काळात नंतर तुम्हाला तुमची ब्रँड व्हॅल्यू जपावी लागते, वाढवावी लागते. तुमच्या बऱ्याच कॉन्सेप्ट नंतर मार्केट मध्ये कॉपी होतात तेव्हा तुम्ही नवीन कसे हे आपल्याला दाखवून द्यावं लागत. हे सगळं व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर करावंच लागत. मोठा व्यवसाय उभा करताना सोबत एकदिलाने काम करणारी टीम हवी. जर टीमवर्क असेल तर तुमची ग्रोथ फास्ट होते.
व्यवसायात नाविन्यता असेल तर मार्केट तुमचं आहे. आम्ही गन्ना मास्टर जेव्हा चालू केलं तेव्हा मार्केट मध्ये आमच्या नावासहित आमच्या कॉन्सेप्ट देखील कॉपी केल्या. परंतु आम्ही देत असलेली सर्व्हिस आणि परिणाम हे कोणीही देऊ शकलं नाही. नवीन तरुणांनी व्यवसायांत पडताना या गोष्टी लक्षात ठेवा. इथं तुम्हीच तुमचा कोच असता, जे काही करायचं ते डोक्याने करा येणारा काळ तुमचाच असेल.
नोकरी, व्यवसाय आपल्या इच्छेने निवडा आणि त्यात बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना नोकरी जमेल काहींना व्यवसाय. प्रामाणिक कष्ट केले कि लाथ मारू तिथून पाणी निघेल. आपण कष्ट करत जाऊ देणारा देत जाईल…
डॉ. अंकुश चोरमुले. आष्टा
८२७५३९१७३१