नवीन सरकारच्या “किमान समान कार्यक्रमा”त आर्थिक अजेंड्याच्या बरोबरीने अजून दोन गोष्टींवर भर दिला गेला पाहिजे
(अ ) सामाजिक सलोखा टिकवणे व वाढवणे आणि
(ब ) पर्यावरणीय अरिष्टाची धार बोथट करणे
महाराष्ट्र विकास आघाडीने “समान कार्यक्रम” मध्ये शेती, बेरोजगारी, महिला, शिक्षण, शहरविकास, आरोग्य, उद्योग, पर्यटन, कला व संस्कृती इत्यादी सामील केले आहे. यात मतभेद होण्यासारखे काही नाही
सामाजिक सलोखा व पर्यावरणीय आयामांकडे दुर्लक्ष केले तर राज्याची जीडीपी वाढती राहताना सुद्धा सामान्य नागरिकांचे आयुष्य नरकासमान होऊ शकते
सामाजिक सलोखा
समाजात दुही माजवणारे विचार / भावना जिवंत असतील तर विविध समाजघटकांमध्ये अविश्वास तयार होतो, गुणवत्तेपेक्षा इतर बिगर आर्यिक बाबींना महत्व येते आणि आर्थिक घडी विस्कटते
राज्यातील सामाजिक सलोखा गृहीत धरता कामा नये; कारण महाराष्ट्राला आपण देशात जे काही चालते, भविष्यात घडेल त्यापासून इन्स्युलेट करू शकणार नाही.
सामाजिक सलोखा आपोआप बिघडत नाही, हेतुतः बिघडवला जात असतो, त्यामागे काहीतरी छुपा अजेंडा असतो हे सर्वाना माहित आहे
त्यातून आघाडीत बिघाडी घडवली जाऊ शकते
पर्यावरणीय अरिष्ट
पर्यावरणीय प्रश्नांकडे हतबलतेने नैसर्गिक अरिष्ट म्हणून न बघता ती मोठ्या अंशाने मानव निर्मित संकटे देखील आहेत म्हणून बघायला पाहिजे उदा. शहरात नदीपात्रातील बांधकामे
अलीकडेपर्यंत हवामान बदल फक्त शेतीवर विपरीत परिणाम करेल असा भ्रम होता. पण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामीण व शहरात देखील हाहाकार उडू शकतो हे आपण अनुभवत आहोत
नवीन सरकारने या दोन बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे
संजीव चांदोरकर (२९ नोव्हेंबर २०१९)
छान,
What’s prices