Friday, July 1, 2022

नेदरलॅंडची मेगा ग्रीनहाऊसेस मॉडेल्स लवकरच भारतात

नेदरलॅंडस्थित कंपन्यांना त्यांची ग्रीनहाऊसेस पायलट मॉडेल्स भारतात उभारायची आहेत तसेच संबंधित सेवांची विक्री करायची आहे. यासंदर्भात ‘हिंदू बिझनेस लाईन’ दैनिकात 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बातमीचा अनुवाद पुढीलप्रमाणे –

डच ग्रीनहाऊस डेल्टा (Dutch Greenhouse Delta) असोसिएशनच्यावतीने हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशांत प्रत्येकी एक ग्रीनहाऊस उभारली जातील. नेदरलॅंडप्रमाणे उच्च उत्पादकता (high-yielding) उत्पादन पद्धती भारतातही लोकप्रिय व्हावी हा उद्देश आहे, असे स्पष्टीकरण देत असोसिएशनने सांगितले, “नेंदरलॅंडमधील फलोत्पादन तंत्रज्ञानाचे मार्केटिंग करण्यासाठी असोसिएशन स्थापन झालेय. नेदरलॅंड हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा शेतमाल निर्यातदार आहे. आमच्या असोसिएशनमधल्या कंपन्या ग्रीनहाऊस फलोत्पादन व संबंधित इकोसिस्टीममध्ये एक्स्पर्ट आहेत.”
“भारताच्या तुलनेत नेदरलॅंडमधील भाज्यांचे दर जवळपास सारखेच किंवा कमी राहतात. तथापि, ‘मास प्रॉडक्शन’मुळे आम्ही नफा कमवतो. वर्षभर उत्पादन मिळत राहते. आमच्या ‘ग्रीनहाऊस’मध्ये पारंपरिक शेतीच्या तुलनेत 96 टक्के कमी पाणी लागते तर 150 पटीने उत्पादनवाढ मिळते. ग्रीनहाऊस उभारणी, कंटोल सिस्टीम्स, बी, वित्तपुरवठा व मार्केटिंग अशी इकोसिस्टीम उभारण्यात एक्स्पर्ट अशा वीस कंपन्या असोसिएशनच्या सदस्य आहेत.”

“भारतातील आमचे ग्रीनहाऊस प्रकल्प हे (validation) व व्यवहार्यता (feasibility) पडताळणी स्टेजमध्ये आहेत. स्थानिक भागीदार, क्लायंट्स आणि सरकारकडून अजून इनपूट्स मिळायचे आहेत. चीनमध्ये असे प्रोजेक्ट्स सुरू झाले आहेत, दक्षिण आशियात आता प्रयत्न करतोय.”
“या प्रकल्पातील वित्तपुरवठ्याची काळजी आम्ही घेवू. रोबो बॅंकसह अन्य डच वित्तसंस्था पाठिशी आहेत. सुरवातीच्या स्टेजमध्ये नेदरलॅंड वा भारत सरकारकडून काही सबसिडी मिळू शकेल मात्र या प्रोजेक्ट्सच्या यशस्वीतेत सबसिडी हा घटक अंतर्भूत नाही आणि आमच्या कामकाज पद्धतीत प्रकल्प यशस्वीतेसाठी सरकारी सबसिडीची गरज भासत नाही.”

“संबंधित प्रोजेक्ट्साठी भारतातील मोठ्या हॉटेल्स चेन, सुपरस्टोअर्स आणि अन्य संस्थात्मक घटकाबरोबरही काम करतोय. एकदा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला की नंतर उर्वरित देशात त्याचा विस्तार करता येईल.”
“जे आपली जमीन लीजवर देऊ शकतील आणि भागीदार होवू शकतील अशा शेतकऱ्यांच्या शोधात आहोत. शिवाय, ग्रीनहाऊसमध्ये रोजगाराची आणि जीवनमान उंचावण्याची संधी असेल. या मॉडेलमध्ये भारतीय शेतकऱ्याला सरासरी 500 युरो किंवा 40 हजार रुपये प्रतिमहिना किंवा त्याहून जास्त मिळण्याची शक्यता आहे,” असे असोसिएशनचे संचालक श्री. देश रामथान यांनी म्हटलेय. (अनुवाद – दीपक चव्हाण, पुणे. 22 ऑक्टोबर 2019)
फोटो कॅप्शन – नेदरलॅंडमधील ग्रीनहाऊसचा प्रातिनिधिक फोटो.

पूरक माहिती – ‘नॅशनल जिओग्राफिक’मध्ये नेदरलॅंडच्या शेतीवर लेख आलाय. त्यात या लहानशा देशाला जगाचं शेतीचं पावरहाऊस म्हटलय. अमेरिकी डॉलर्समध्ये नेदरलॅंड जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अन्न निर्यातदार देश ठरलाय. तंत्रज्ञानाच्या बळावर अत्यंत कमी क्षेत्रात सर्वाधिक उत्पादन हा देश घेतो.
फोटोत वेस्टलॅंड या ग्रीनहाऊसच्या राजधानीतील वातावरण नियंत्रित फार्म दिसताहेत.

संबंधित लेख

2 COMMENTS

  1. माझी जमिन लिझवर देतो पण कशाप्रकारे ते सांगा,8459077641

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची