Saturday, May 21, 2022

उसाचे पाचट लवकर कुजण्यासाठी करा खालील उपाय

खोडवा उसामध्ये पाचट लवकर कुजण्यासाठी काय करावे? खते कशी द्यावीत

1) उसाच्या पाचटात 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फुरद आणि 0.7 ते 1 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते. ऊसतोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत. उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते.

2) बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.

3) शेतात पसरलेल्या पाचटावर प्रतिहेक्‍टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 किलो पाचट कुजविणारे जिवाणू वापरावेत. त्यानंतर उसास पाणी द्यावे. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून द्यावे किंवा शेतात जनावरे मोकळी सोडावीत. जनावरांच्या पायाने पाचट दबण्यास मदत होते. पाचटाचा मातीशी संबंध येऊन ते हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते.

4) खोडव्याला पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली खतमात्रा द्यावी. माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वाफसा असताना दोन समान हप्त्यांत द्यावी. पहिली खतमात्रा 15 दिवसांच्या आतच पूर्ण करावी. पहारीने बुडख्यांपासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर 15 ते 20 सें.मी. खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर 30 सें.मी. ठेवावे. दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.

5) रासायनिक खतांना पूरक म्हणून जैविक खतांचा वापर केल्यास रासायनिक खतात बचत होते. ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरीलम, ऍसिटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक प्रत्येकी 1.25 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात एकूण पाच किलो जिवाणू खतांचा वापर करावा. त्यासाठी ही जिवाणू खते 25 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये एकत्र करून उसाच्या ओळीच्या बाजूने टाकावीत किंवा पाण्यामध्ये किंवा शेणाच्या स्लरीमध्ये एकत्र करून वापरावीत. जिवाणू खतांचा वापर केला असता 25 टक्के नत्र आणि स्फुरद खताची बचत होते; म्हणून शिफारशीत नत्र आणि स्फुरदाची खतमात्रा 25 टक्‍क्‍यांनी कमी करावी.

संपर्क – ०२३४२ २९९३०५
गन्ना मास्टर अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड

संबंधित लेख

2 COMMENTS

  1. छान माहिती दिलीत,
    पण पाचट कुजवणारे जीवाणू कुठे मिळतील ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची