Friday, August 12, 2022

लंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध

प्रत्येक मनुष्याचे स्वप्न आहे की एक चांगली नोकरी करावी आणि चांगले उत्पन्न मिळवावे जेणेकरुन कुटुंबातील छोट्या-मोठ्या गरजा सहज पूर्ण होतील. पोरबंदर, गुजरातमधील बारन गावचे राम दे खुटी हे देखील पत्नी भारती खुटी यांच्यासमवेत लंडनमध्ये सेटल होते. दोघांनाही लाखाच्या घरात पगार होता. एके दिवशी दोघांनी ठरवले की गावी परत जाऊन तिकडेच शेती करू. त्यांनी घेतलेला हा धक्कादायक निर्णय शेवटी योग्य असल्याचे सिद्ध झाले. आज हे जोडपे आपल्या गावी परतले आणि देशभरातील तरूणांसाठी प्रेरणा बनले जे अगदी लहान नोकरीसाठीही गाव किंवा शहर सोडतात. दोघांची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेऊयात

राम 2006 मध्ये इंग्लंडला गेले

राम दे खुटी  वर्ष 2006 मध्ये प्रथम इंग्लंडला गेले होते. तिथे त्यांना चांगली नोकरी देखील मिळाली होती. 2008  मध्ये राम यांनी भारतात येऊन भारतीशी लग्न केले. त्यावेळी भारती राजकोटमध्ये विमानतळ व्यवस्थापन आणि एअर होस्टेसचा अभ्यास करत होत्या. २०१० मध्ये भारती  शिक्षण संपल्यानंतर लंडनला पती रामसोबत राहण्यासाठी गेल्या. तेथे त्यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटन व आतिथ्य व्यवस्थापन विषयात पदवी संपादन केली. या पदवीनंतर त्यांनी ब्रिटिश एअरवेजच्या हीथ्रो विमानतळावरुन आरोग्य आणि सुरक्षिततेचा कोर्स केला आणि त्यानंतर तेथे काम करण्यास सुरवात केली. राम आणि भारती लंडनमध्ये लक्झरी आयुष्य जगत होते.

भारतात परत का आले

बहुतेक लोक असा विचार करत असावेत की जेव्हा दोघे इंग्लंडमध्ये इतके अप्रतिम आयुष्य घालवत होते तेव्हा दोघे का खेड्यांकडे वळले. वास्तविक, इंग्लंडमध्ये वास्तव्य करताना राम यांना आपल्या आई वडिलांची काळजी कोण घेईल याबाबत चिंता होती. त्याचवेळी त्यांची शेती देखील मजुरांच्या करवी केली जात होती. आई वडिलांची सेवा करण्याच्या आणि शेतीत काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने दोघांनी भारतात येण्याचे ठरविले. यात पत्नी भारती यांचीही पूर्णपणे संमती होती.

शेतीत नवीन प्रयोग
अखेरीस हे दोघे लंडनची आलिशान जीवनशैली सोडून भारतात आले. येथे त्यांनी नव्याने शेती व पशुपालन करण्याचे काम सुरू केले. पारंपारिक शेती सोडून त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. सुरुवातीला दोघांनाही हे काम करण्यात त्रास होत होता कारण या दोघांनी यापूर्वी कधीही हे काम केले नव्हते. तथापि, नंतर ते दोघेही शेती करण्यात गुंतले. दूध काढण्यापासून  सर्व कामे भरती स्वतः करतात. आपल्या ग्रामीण जीवनासंदर्भात, त्यांनी लिव्ह व्हिलेज लाइफ विथ ओम अँड फॅमिली नावाचे एक यूट्यूब चॅनल देखील तयार केले आहे, ज्यात 6 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. ज्यावर ती तिच्या रोजच्या नित्यकर्माविषयी माहिती देते. शेती व पशुसंवर्धन यावर टिप्स देते.  राम आणि भारती यांना एक मुलगा देखील आहे, जो बहुतेक व्हिडिओंमध्ये दिसतो.

त्यांचा व्हिडिओ आपण खालील लिंकवरती पाहू शकता

https://www.youtube.com/channel/UCK_cj1K08Zry1HvIXBcgIQw

 • फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का ?
  पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने इतर हंगामांपेक्षा जास्त असतो. त्यात झडीचा व संततधार पाऊस रोगांचे नियंत्रण ठेवणे अवघड बनवतो. बऱ्याच वेळा फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुनर्फवारणी विषयी संभ्रम निर्माण होतो. पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते फवारणीनंतर किती वेळाने पाऊस आला ? फवारणीनंतर साधरणतः ३-४ तास पाऊस नको असतो. • रसायन जर […]
 • निचरा पाईप कशासाठी या बाबत ही थोडक्यात माहिती..
  जमिनीची कमी निचरा क्षमता, भूपृष्ठापासून कमी खोलीवर अभेद्य थर, पाण्याचा अनियंत्रित वापर, खारवट पाण्याचा शेतीसाठी वापर, कॅनॉल, तलावातून पाण्याचा पाझर, फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांचा कमी वापर, विस्कटलेली नैसर्गिक निचरा पद्धती यांसारख्या कारणांमुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षार आणि पाण्याचे प्रमाण वाढत आहे. या जमिनींची सुपीकता कायम ठेवण्यासाठी सामूहिक पद्धतीने पाणी निचरा प्रणालीचा वापर करणे आवश्‍यक आहे.सध्याच्या […]
 • आता थेट मोबाईल वरून होणार ऊसाची नोंद
  साखर कारखान्यांकडील बोगस ऊस नोंदणीच्या प्रकाराला आळा बसावा, यामध्ये घडत असलेले राजकारण संपुष्टात यावे, यासाठी शेतकर्‍यांना आता आपल्या उसाची नोंदणी घरबसल्या संबंधित साखर कारखान्याकडे करता येणार आहे. त्यासाठी साखर आयुक्तालयाने स्वतंत्र अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपमुळे ऊस क्षेत्राची अचूक नोंद होणार आहे. तसेच ऊस नोंदणीसाठी कारखान्यांमध्ये असलेल्या स्पर्धेला लगाम बसणार आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून […]
 • गन्ना मास्टर किट खालील प्रतिनिधीकडे उपलब्ध
  विविध भागात गन्ना-मास्टर चे उत्पादने उपलब्धीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा सांगली जिल्हा वाळवा तालुका आष्टा, दुधगाव, शिगाव परिसर अमोल पाटील 9403964299 रेठरे हरणाक्ष,जुनेखेड, नवेखेड, परिसर प्रकाश माने 9960499178 इस्लामपूर साखराळे परिसर अभयसिंह थोरात 9960337575 कमेरी येल्लूर परिसर अक्षय फसाले 7498921564 कासेगाव, वाटेगाव,तांबवे, परिसर अमोल आडके 9577764343 शिराळा तालुका उपवळे, बिऊर,तडवळे, अंत्री, पाडळी, प्रदीप पाटील 9309522636 […]
 • आडसाली ऊस हंगाम – जमिनीची तयारी
  पिकाच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमीन चांगली तयार करणे नितांत गरजेचे असते. जमिनीचा वरचा थर, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने पीक वाढते, तो थर हलवून भुसभुशीत करणे, त्यातील तणासारखा भाग काढून टाकणे, मशागत करून वाढीला पोषक वातावरण निर्माण करणे इ. कामे योग्य प्रकारे केली तर ऊस पीक जोमदार येऊन उत्पादनही चांगले येते. जमिनीची तयारी कशी करावी ?१. […]

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची