व्यापारी नाव- मोवेंटो एनर्जी
पिके (कंसात हेक्टरी प्रमाण)
- वांगी- लालकोळी, पांढरी माशी (500 मिली 500 लिटर पाण्यात)
- भेंडी- लाल कोळी (500 मिली 500 लिटर पाण्यात)
मोवेंटो एनर्जी हे एक नवीनतम संयुक्त किटकनाशक असून हे स्पर्शजन+ पोटविष म्हणून काम करते. हे किटकनाशक टेट्रामिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह+ निओनिकोटिनोईड या गटात मोडते. हे जगातील दोन्ही दिशेने काम करणारे पहिले आंतरप्रवाही किटकनाशक असून ते झाडाच्या संस्थेमध्ये दोन्ही दिशेने म्हणजे खालून वर आणि वरून खाली कार्य करते. याचे विस्थापन रसवाहिनी आणि जलवाहिनी मार्फ़त होते ज्याच्यामुळे खोडापासून मुळापर्यंत असणाऱ्या सर्व रसशोषक किडीवर नियंत्रण भेटते. या कीटकनाशकांची कार्यक्षमता खूप मोठी असून हे किटकनाशक बऱ्याच रसशोषक किडी व कोळीवर काम करते त्यामुळे किडीपासून दीर्घकाळ नियंत्रण भेटते. शेतामध्ये किडीच्या प्रदुर्भावाच्या सुरवातीच्या काळात या किटकनाशकाचा वापर केल्यास किडीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण भेटते.
टीप-
सदरचे किटकनाशक मधमाशीसाठी हानिकारक असल्यामुळे याचा वापर मधमाशी शेतात कार्यक्षम असताना टाळावा. पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असल्यास देखील सदरच्या कीटकनाशकाचा वापर टाळावा..
- डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले
- कृषी किटकशास्त्रज्ञ व प्रबंधक होय आम्ही शेतकरी समूह
- ८२७५३९१७३१