Tuesday, January 18, 2022

जमिनीची गुणवत्ता टिकवून विक्रमी उत्पादन काढण्यासाठी खालील गोष्टी कराच

ऊसाला पाणी देण्याच्या ज्यापारंपरिक पद्धती आहेत त्यामध्ये बदल करणे,सुधारणा करणे, अतिशय गरजेचे आहे. तरच पाण्याचा अतिरेकी वापर कमी होईल.त्यासाठी वाकुरी पद्धत,साखळी पद्धत व डुबक पद्धत बंद करून सरी पद्धतीने पाणी देणे. त्यामुळे पाणी कमी बसते.व कायम वापसा कंडिशन राहते.

बऱ्याच शेतकऱ्यांना ऊसाला पाणी देताना गरगरीत पाणी दिल्याशिवाय मनाला समाधान वाटत नाही. पाणी जादा होऊन शेजाऱ्याच्या शेतात पाणी फुटून,उलटून गेल्यानंतरच त्यांला पाणी दिल्यासारखं वाटत. जादा पाणी दिल्याने ऊसामध्ये वाढ न होता उलट आपल्याच उत्पादन मध्ये घट येत असते. तसेच जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढत जाते. वापसा कंडिशन असल्याशिवाय ऊसाची किंवा कुठल्याही पिकांची वाढ होत नाही.आणि आपण तर ओल हटू देतच नाही. आपणाला काय वाटत की जितके जादा पाणी देऊ तितके ऊसाचे जादा उत्पादन मिळेल.

रात्री ऊसाला पाणी लावायचं ,आणि सकाळी पाणी बघायला गेल्यानंतर आत दगड टाकायचा. डुबक आवाज आल्यानंतर मग दारी बदलायची. पूर्वी एका बहाद्दर शेतकऱ्याने ऊसाचे पाणी बघण्या करीता ऊसाच्या कटावरून बुलेट जाण्याकरीता वाट केली होती.

ज्यांना शक्य आहे त्यांनी ठिबक सिंचन वरती ऊस शेती करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. भविष्यात आपणाला ऊस शेती करायची असेल तर ठिबक सिंचन केल्याशिवाय ऊस करायला परवानगी मिळणार नाही. त्यामुळे काळाची गरज ओळखून आतापासूनच आपण त्या दिशेने पावले टाकली पाहिजेत.

आज आमच्या गावाजवळ ३००० एकर क्षेत्र हे क्षारपड ग्रस्त आहे. ज्या जमिनीमध्ये पूर्वी सोयाबीन,शाळू,शेंग, तंबाखू ही पिके नंबर एकची यायची.परंतु त्या जमिनी मध्ये ऊसाच्या लागवडी सुरू केल्यानंतर बेसुमार पाण्याचा वापर सुरू झाला.भारी जमिनी, व अत्यंत कमी निचरा, त्यामुळे हळू हळू कालांतराने संपूर्ण भाग क्षारपड व नापीक झालेला आहे.आज त्या जमीनी मध्ये देवबाभळी शिवाय काहीही येत नाही.

आज अशा प्रकारच्या जमीनी सुधारणे साठी सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करणे, व मशागत पूर्व जमिनीमध्ये व खोडव्या पिकामध्ये सबसोयलर चा वापर करणे,अत्यंत गरजेचे आहे.ऊस शेती करत असताना जमिनीची गुणवत्ता टिकवून विक्रमी उत्पादन काढणे.ज्या वेळी आपणाला जमेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो,असे समजावे.

फेसबुक वरील बळीराजा सुरेश कबाडे हे पेज लाईक करा.
श्री. सुरेश कबाडे.
प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999

संबंधित लेख

4 COMMENTS

  1. खरे अमृत पाणी हे तर वाचतेच शिवाय रासायनिक खते, औषधे यांच्यावरील अतिरिक्त खर्च व त्यांपासून जमिन व जमीनीतील सुक्ष्म जिव सृष्टी यांवर होणारा विपरीत परिणाम सुद्धा टाळता येतो.
    ठिबक सारख्या सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केला तर जमिन कायम वापसा स्थितीत राहील्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे.
    उलट आता यापुढे जाऊन अॅटोमेयशन सारख्या स्वयंचलित ठिबक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.

    • पृथ्वी वरील पाणी वाचवण्याचे महाण सामाजिक कार्य व गांडुळे ,सुक्ष्म जिव वाचवून त्यापासून मिळणारे पुण्य हे कल्पणेपलिकडचे आहे.यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला गेला पाहिजे तरच आपण पुढच्या पिढीला जिवंत जमिन बहाल करू शकुत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची