Saturday, August 13, 2022

रिझर्व्ह बँकेची शेतकऱ्यांना अनोखी भेट

आरबीआय कडून किसान क्रेडिट कार्डाद्वारे मत्स्यपालन आणि पशुपालन व्यवसाय करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जावर २ टक्केव्याजदर कपात करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात अली आहे. या बरोबरच अल्पकाळासाठी २ लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात ७ टक्के सबसिडी मिळणार आहे. आरबीआय ने ही महत्वाची घोषणा करत शेतकऱ्यांना अनोखी भेट दिली आहे.

दरम्यान या संधीचा फायदा मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे. कारण सरकारने फक्त या या दोनच व्यवसायांकरिता किसान क्रेडिट कार्डाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. तसेच वेळेवर कर्ज चुकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजावर ३ टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. त्यामुळे हे नियम लागू झाल्यास कर्ज घेतलेल्या संबंधित शेतकऱ्यांना फक्त ३ टक्केच व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे.

संबंधित लेख

6 COMMENTS

  1. होय आम्ही शेतकरी टिम मोलाचे काम करते म्हणुन मी त्याचा आभारी योग्य माहिती देतात

  2. He shakya hot Nahi ith Shivaji Maharajanch janm sthan junnar taluka dis Pune madhil otur gavat kontyach gov banket agree officer Nahi te loan detil kase??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची