Saturday, October 1, 2022

राजू शेट्टी साहेबांनी चळवळ बंद करावी ही कळकळीची विनंती

लोकसभेला राजू शेट्टी यांचा प्रस्थापितांशी लगट केल्याने (जनतेच्या मते) झालेला पराभव आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा शब्द पडू न देणाऱ्या यड्रावकर यांची बंडखोरी आणि चळवळीतील मादनाईक यांचा यड्रावकर यांच्याकडून पराभव हे सगळं काय सूचित करतो ?

सर्वच प्रस्थापित लोकांना मिळून चळवळ संपवायची आहे की काय अशी शंका यायला वाव आहे . अशा वेळी जनतेने चळवळीचे हात मजबूत करणं गरजेचं होतं .

काही लोकं म्हणतात तुम्ही प्रस्थापितांसोबत गेला म्हणून पराभव झाला. त्यांना एक विचारणं आहे , आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर आमचा पराभव होतो याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावरही नाराज आहात मग या न्यायाने त्यांचे तर डिपॉझिट सुध्दा जनता जप्त करेल पण नेमकं ते प्रस्थापित उभे राहिल्यावर प्रचंड मताधिक्याने निवडून येतात मग आता सांगा दुटप्पी कोण ? नेता की जनता ?

या सगळ्याचा अर्थ एकच आहे की जनतेला चळवळ नकोच आहे. लोकांना जर राजू शेट्टी यांचे नेतृत्व मान्य नसेल तर राजू शेट्टीनी जनमताचा आदर करून चळवळ थांबवावी जनतेने मतपेटीतून हाच आदेश दिलेला आहे .

जनता दीड – दोन हजारात आपला ऊस द्यायला स्वतःच तयार असेल तर राजू शेट्टींनी मध्ये पडू नये . जनतेने ज्यांना आपले प्रतिनिधित्व करायची संधी दिली आहे ते काय ते बघून घेतील .राजू शेट्टी साहेबांनी चळवळ बंद करावी ही कळकळीची विनंती

लेखक- डॉ. श्रीवर्धन पाटील

संबंधित लेख

2 COMMENTS

  1. राजू शेट्टी साहेबानी चळवळ बद करावी लागेल कारन जनता स्वार्थ बनलेली आहे.चळवळ उभी राहिली परतू हे सर्व पक्षा मोडून काढण्यासाठी प्रयेतन चालू आहे. व हे चळवळ कोनासाठी आहे. हे जनतेचा लक्षात आले पाहिजेल होत तसे न होता तो ऊलटा अर्थ निघालेला आहे म्हनून चळवळ थाबले पाहीजे.

  2. चळवळ म्हणून म्हणून स्वताच स्वार्थ साधता ती….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची