Tuesday, January 18, 2022

पिकांचं नुकसान झालंय? 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती

खरीप हंगाम 2021 (Kharif season 2021) मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना (Prime Minister Crop Insurance Scheme) सातारा जिल्ह्यात राबवली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमेच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन (Landslide), विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास विमा संरक्षण (Insurance protection) प्राप्त होते. जुलै महिन्यामध्ये काही भागात अतिवृष्टीने (Heavy Rain in Satara) तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झल्याने शेत पिकांचे (Farm Crop) नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना 72 तासांमध्ये देणे आवश्यक आहे. (Report Crop Damage To The Department Of Agriculture Within 72 Hours bam92)

विमा कंपनीस (Insurance Company) शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इन्श्युरन्स व संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषी व महसूल विभाग (Revenue Department) यांना कळवावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक आहे. अधिक तपशीलासाठी तत्काळ नजीकच्या विभागीय कृषीसह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी सपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची