Saturday, August 13, 2022

“उत्तरप्रदेशच्या राजपाल सिंह यांची लिची शेती”

उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्यातील जगैठा गुर्जर गावात राहणारे राजपाल सिंह काही वर्षांपासून शेती करत आहेत. शेती करत असताना त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग केले असून आंबा, पेरू, लिची यासारख्या फळांसाठी एक मॉडेल विकसित केले असून वर्षाला त्यांची कमाई लाखात होते.
राजपाल यांना अगोदरपासूनच शेतीची आवड असल्याने शिक्षण पूर्ण होताच त्यांनी शेती करण्याचे ठरविले.

सुरवातीपासूनच उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात असे त्यांनी १५-२० वर्षे उसाची शेती केली. परंतु त्यांना उसाची शेती करण्यात रस वाटला नाही व त्यांनी यानंतर केळी, पपई याची लागवड केली परंतु यातदेखील त्यांना जास्त नफा झाला नाही. त्यानंतर त्यांनी मधुमक्षिका पालन करण्याचे ठरविले यादरम्यान त्यांनी लिचीचा बाग बघायला मिळाला.

यानंतर त्यांनी १९९९ मध्ये फळआधारीत कृषी व्यवस्था विकसित केली ज्या अंतर्गत एका वेळी दोन प्रकारच्या पिकांची शेती केली जाऊ शकत होती. त्यांनी लिची बरोबर पिच या फळाची लागवड केली. लिचीच्या झाडांना तयार होण्यासाठी १५ वर्ष लागतात तर पिचची झाडे लवकर तयार होतात. राजपाल यांना पिचपासून चांगली कमाई झाली पिचनंतर त्यांनी लिची बरोबर पेरूची देखील लागवड केली व त्यापासून देखील त्यांना चांगली कमाई झाली.

सध्या राजपाल लिचीच्या १५ -१६ वेगवेगळ्या जातींची लागवड करतात. राजपाल या फळांना स्थानिक बाजारात विकण्यापेक्षा बँगलोर व भुज या ठिकाणी निर्यात करतात. लिचीला बँगलोर व भुज या ठिकाणी ४००-४५० रुपये प्रति किलो दर आहे. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी राजपाल यांना लिचीपासून प्रति हेक्टर ७ – ८ लाख रुपये तर पेरूपासून ६-७ लाख रुपयांची कमाई होते.

राजपाल यांनी सुरवातीला ५ हेक्टरवर सुरु केलेला बगीचा आज ८ हेक्टरवर वाढविला आहे.
राजपाल सांगतात की या फळांची लागवड करण्याआधी मी बाजारात कोणत्या फळांना अधिक मागणी आहे याचा अभ्यास केला. राजपाल यांनी देशाचे पूर्व राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील आणि पूर्व कृषी मंत्री शरद पवार यांच्यासमोर शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व केले आहे, तसेच आपल्या जीवनाचा बराचसा वेळ ते शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात घालवतात.

आजपर्यत त्यांनी ४००० शेतकऱ्यांना फळांची शेती करण्याबाबत प्रशिक्षण दिले आहे.
राजपाल सांगतात की, शेतकऱ्याने स्वतः पिकवलेल्या उत्पादनाचे प्रोसेसिंग करावे तसेच पिकवलेल्या मालासाठी कोणावरही निर्भय न राहता थेट बाजारात त्याची विक्री करावी जेणेकरून मालाला चांगला दर मिळेल.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची