Saturday, August 13, 2022

कांदा लागणी – प्रवाहाविरोधात जाण्यात फायदाच


इजिप्तहून आयातीत कांद्याची व्यापाऱ्यांपर्यत पोच किंमत 375 ते 400 डॉलर प्रतिटन म्हणजेच 2600 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल निघते, असे हिंदू बिजनेस लाईनच्या बातमीत म्हटलेय. याचा अर्थ किमान अडीच हजाराच्या वर आयातीची पडतळ येते. सध्याच्या देशांतर्गत होलसेल रेटच्या तुलनेत निम्माने कमी कमीत आयात माल मिळतो पण त्याचा आकार, उपलब्धता खूपच तोकडी आहे. यात मुख्य मुद्दा असा की भविष्यात जर कांद्याचे उत्पादन देशांतर्गत मागणीच्या तुलनेत संतुलित, नियंत्रित राहिले तर किमान दोन हजार रुपये बाजारभाव मिळू शकतो.

कारण आयात पडतळ आजही अडीच हजाराच्या वर आहे. *यातलं कटूसत्य अस की उत्पादन नियंत्रण करणे ही अशक्यप्राय बाब आहे*. यंदाच्या वाढत्या लागणीवरून ते कळतय. पण, व्यक्तिगत पातळीवर मात्र आपण क्षेत्र मर्यादित ठेऊन आपले आर्थिक नुकसान टाळू शकतो हे खरे. डिसेंबर – जानेवारीत महाराष्ट्रातील प्रत्येक सजग कांदा उत्पादकाने गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान तीस ते चाळीस टक्के क्षेत्र कमी केले पाहिजे. याने प्रवाहाविरूद्ध पोहण्याचे समाधान तर मिळेलच, शिवाय एप्रिलनंतरच्या संभाव्य उत्पादनवाढीच्या समस्येत आपला वैयक्तिक वाटा कमी आहे, ही बाब देखिल सुखावणारी असेल.

– दीपक चव्हाण, ता. 29 नोव्हेंबर 2019

टीप- आयात पडतळ कमी अधिक होवू शकते. खरे तर भारताची गरज भागवू शकेल, एवढा सरप्लस देशात कुठल्याही कांदा उत्पादक देशाकडे नसतो. भारतीय कांद्याचे रेट वाढले की आखातासह दक्षिण आशियायी देशांत कांद्याचे रेट वाढतात.

अधिक संदर्भासाठी, आकडेवारीसाठी यापूर्वीच्या पोस्ट्स पहा.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची