केंद्र सरकारकडून जन धन खातेधारकांच्या खात्यात ५०० रुपयांचा आणखी एक हप्ता जमा करण्यात आला आहे. याद्वारे आता लोक बँकांमध्ये जाऊन पैसे काढू शकतील. परंतु हे करण्यासाठी, त्यांना 4 मेपासून अस्तित्त्वात आलेल्या काही नियमांचे पालन करावे लागेल. परंतु इतरांप्रमाणेच आपल्या जनधन खात्यात ५०० रुपयांचा हफ्ता आला नसेल तर आपले जनधन खाते बंद झाले असण्याची शक्यता आहे. याची कोणतीही कारणे असू शकते. आपल्याला आपल्या खात्यात पैसे मिळालेले नसल्यास, आपले बँक खाते बंद झाले का हे ताबडतोब तपासा. वास्तविक, बर्याच काळासाठी खाते वापरत नसल्याने खाते निष्क्रिय होते. आपणास अशीच समस्या येत असल्यास, खाते पुन्हा कसे सुरू करावे ते आम्ही सांगत आहोत.
खाते पुन्हा सुरू करण्याचा हा मार्ग आहे
जर जनधन खाते बंद असेल तर ते पुन्हा कसे सक्रिय केले जाईल हे जाणून घेण्यापूर्वी आपले खाते का बंद झाले आहे ते शोधा. सन २०१४ मध्ये जन धन योजनेची सुरवात केली होती. त्याअंतर्गत, ६ वर्षांपूर्वी, सरकारने सर्व गरीब असहाय लोकांना बँक खाती उघडण्याची विनंती केली, ज्या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची रक्कम ही लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जायची. गेल्या ३ ते ४ वर्षात काही जनधन खात्यात कोणत्याही रकमेची देवाणघेवाण झालेली नाही. ज्यामुळे ती खाती बँकांनी निष्क्रिय केली किंवा बंद केली आहेत. अशा परिस्थितीत, ते पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल.
जन धन खाते बंद झाले असल्यास चालू कसे करावे?
जर आपले जनधन खाते बंद केले गेले असेल तर आपण ते सहजपणे कार्यान्वित करू शकता परंतु त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या काय आहेत याविषयी माहिती खालीलप्रमाणे आहे.
जन धन खात्याशी संबंधित पहिली गोष्ट म्हणजे आपले जनधन खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे. तसे असल्यास, नंतर आपल्याला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. ज्या लोकांचे जनधन खाते आधार कार्डशी जोडलेले आहे आणि जर त्यांचे खाते बर्याच काळापासून ट्रान्झॅक्शन न केल्यामुळे निष्क्रिय झाले असेल तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत काही काळानंतर त्यांच्या आधार कार्डची माहिती बँकेला दिल्यानंतर त्यांचे खाते पुन्हा कार्यान्वित होईल आणि त्यांना योजनेंतर्गत मिळणा लाभाची रक्कमही मिळेल.
परंतु ज्या लोकांचे खाते आधार कार्डाशी लिंक केलेले नाही, त्यांचे खाते आधार कार्डाशी जोडले जाईपर्यंत त्यांचे खाते चालू केले जाऊ शकत नाही. आधार कार्ड खात्याशी जोडण्यासाठी आपल्याला त्या बँकेत जावे लागेल. जन धन खाते पुन्हा सुरू करण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे, त्याशिवाय आपले खाते चालू राहू शकत नाही.
ही प्रक्रिया आहे
या संपूर्ण प्रक्रियेसाठी, आपल्याला आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल आणि आपण आपले आधार कार्ड व्यतिरिक्त इतर कागदपत्रे दिल्यानंतरच आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल. तसेच, सक्रिय केल्यावर आपणास कदाचितत्या खात्यात काही पैसे टाकावे लागतील. या सर्व गोष्टींसाठी आपल्याकडून शुल्क आकारले जाणार नाही.