Saturday, January 28, 2023

शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान सप्टेंबर पासून मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यासह राज्यातील पूरग्रस्तांना 15 हजारांची तात्काळ मदत करणार असाही शब्द एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भातील मदतीची रक्कम देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अँपचा वापर देखील करण्यात येणार आहे.

लवकरच मोबाईल अँप्लीकेशन द्वारे ई-पंचनामा, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे यासाठी प्रणाली नव्याने विकसित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येईल अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

राज्यात ज्या ज्या क्षेत्रांमध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्तीप्रवण क्षेत्र आहेत. तिथे नागरिकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागते. अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची