Tuesday, January 18, 2022

काय म्हणतंय मार्केट? दिनांक २३/८/२०२१ पर्यंतच्या मार्केट नोंदी

* सोयाबीनच्या जागतिक बाजारात तेजी सुरू आहे. जून मध्ये सोयाबीन सी पोर्टवर पोच करण्याचा सरासरी दर ७८३ डॉलर प्रति टन होता तो जुलै मध्ये ९५० डॉलर प्रति टन झाला आहे. असे असले तरीही भारतातून सोयाबीन निर्यात मागील वर्षीच्या समान कालावधीच्या ५७% कमी झाली आहे. सध्या राज्याची एकूण खरीप पेरणी १ कोटी ४२ लाख हेक्टर च्या जवळपास झाली आहे आणि यापैकी जवळपास ४४.५ लाख हेक्टर क्षेत्र हे एकट्या सोयाबीन पिकाचे आहे. सोयाबीन पिकातील जागतिक प्लेयर असणारी एडिएमने मॅरथॉन पेट्रोलियम कॉर्पोरेशन सोबत करार केला आहे. एडीएमच्या नुकत्याच जाहीर झालेल्या स्पिरिटवुड सोयाबीन प्रक्रिया सुविधेत मॅरेथॉन गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे एडिएम मॅरेथॉनच्या जैवइंधन सुविधेला दरवर्षी अंदाजे ७५ दशलक्ष गॅलन बायोडिझेलसाठी पुरेसे फीडस्टॉक पुरवेल.
सध्या चीन अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करत आहे, अमेरिकेच्या एकूण सोयाबीन निर्याती पैकी अर्धी म्हणजे जवळपास १.१ दशलक्ष टनांपेक्षा जास्त सोया निर्यात एकट्या चीनला झाली आहे. पण यापुढे चीन आयात कमी करण्याची शक्यता चीनचे अभ्यासक मांडत आहेत.

* मागच्या एक महिन्यात जुलै मध्ये १३८९५ टन (अनिधिकृतरित्या अधिक आयात झाल्याचे बोलले जाते) रिफाइंड पाम तेल आयात झाले आहे जे जून मध्ये फक्त ३२०० टन झाले होते. याचे मुख्य कारण म्हणजे रिफाइंड पाम तेल आयात ड्यूटीमुक्त करण्यात आले आहे.  तसेच केंद्र शासनाणे सोयाबीन तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्याचे कारण देत २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर पर्यंत कच्चे सोयाबीन व सूर्यफूल तेलची आयात ड्यूटी अर्धी करत ७.५% केली आहे.

* ३० सप्टेंबर अखेर देशातून एकूण साखर निर्यात ७१.५ लाख टन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच निर्यात वाढविण्या बाबत केंद्राकडूनही साखर कारखान्यांना सूचित करण्यासाठी नुकतीच एक अधिसूचना काढण्यात आली आहे. बाजारात साखरेचे दर वाढले आहेत आणि आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येत्या हंगामात साखर निर्यात सबसिडी न देण्याचा निर्णय केंद्राने जाहीर केला आहे, बाजाराची स्थिती पाहता सध्या सबसिडीची गरज वाटत नाही. नवीन साखर हंगाम सुरू होण्यापूर्वीच ८ लाख टन साखर निर्यातीचे सौदे झाल्याचे समजते. यासाठी ४४०-४५० डॉलर प्रती टन दर मिळत असल्याचे बोलले जात आहे.

* जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन घटल्याचे सविस्तर वृत्त तुम्ही अग्रोवनला वाचले असेलच. ज्यानुसार जागतिक पातळीवर उत्पादन मागील वर्षीपेक्षा १५ लाख टनांनी घटण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच जागतिक पातळीवर कापसाचे क्षेत्र जवळपास १२% घटले आहे. भारतात मागीलवर्षी पेक्षा १० लाख हेक्टर कापूस लागवड कमी झाली आहे. महाराष्ट्रात सरासरी कापूस लागवड क्षेत्रापेक्षा ३३४००० हेक्टर लागवड कमी होऊन एकूण कापूस लागवड ३८ लाख ४९ हजार हेक्टरवर झाली आहे.
यूएसडिएच्या अहवालात मात्र भारतात कापूस उत्पादन मागील वर्षीच्या जवळपास म्हणजे ३६३.६६ लाख गाठी (१६५ किलोची एक गाठ) राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
मागणीत सतत सुरू असलेली तेजी यामुळे मात्र दर चांगले मिळण्याची शक्यता अधिक आहे. शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई हंगामाच्या सुरुवातीलाच करू नये किंवा असा साठा करण्या बाबत अनेक गावात चर्चा पहायला मिळते. टप्याटप्याने कापूस विक्री केल्यास नक्कीच दर मिळवता येऊ शकतील.

*हरभरा वायदे बाजार मागील आठवड्यात सोमवारी सप्टेंबर वेद ५०३७ रुपयांवर सुरू होऊन आठवडा अखेर  शुक्रवारी १५८ रुपये वाढून ५१९५ वर बंद झाला होता पण चणा वायदे बाजार तात्काळ बंद करण्यात आला आहे. सेबीच्या निर्देशानुसार एनसीडिएक्सवर डिसेंबर पासून पुढचे सौदे सुद्धा पुढील आदेश येई पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. परिणामी मार्केटमध्ये दर खाली गेले आहेत.

संचालक

होय आम्ही शेतकरी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची