गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
गन्नामास्टर - उस शेतीची नवी दिशा
Date

शेणखताला पर्याय आहे का?

बऱ्याच वेळेला शेतकरी विचारतात की शेणखत आपल्याकडे उपलब्ध नाही तर त्यासाठी मग काय पर्याय आहे. एक गोष्ट  मी त्यांना सांगू इच्छितो की, शेणखताला  काहीही पर्याय नाही. शेणखत हे शेतात आपण घातले पाहिजेत. उसाच्या लागवडीच्या वेळी दरवर्षी एकरी १२ टन एवढे शेणखत घातले पाहिजे. हिरवळीचे खत हे शेणखताला पर्याय असू शकत नाही. पण एखाद्या वेळी शेणखत घालणे शक्यच नसेल किंवा आपल्याला उपलब्ध होऊ शकत नसेल, तर त्यावेळी आपण हिरवळीच्या खताचा वापर करू शकतो. पण हे शेणखातला पर्याय असू शकत नाही हे आधी लक्षात घ्या.

शेणखत का वापरावे -
• जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी आणि  त्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ होण्यासाठी शेणखत गरजेचे आहे
• जमिनीतील सूक्ष्म जीवांची ऍक्टिव्हिटी चांगली वाढण्यासाठी शेणखताची मदत होते. जर जमिनीतील सूक्ष्मजीव चांगल्या पद्धतीने वाढले तर नक्कीच ते आपल्या पुढच्या पिकाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरू शकते.
• त्याच बरोबर उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.

शेणखत कुजवण्याची पद्धत -
शेणखत कुजवताना जमिनीच्या खाली खड्डा काढून कधीही कुजवू नये. शेणखत हे जमिनीच्या वरती कुजले पाहिजेत. जर आपण खड्डा काढून कुजवण्याचा प्रयत्न करत असू तर ते योग्य पद्धतीने कुजत नाही. म्हणून शेणखत हे जमिनीच्या वरतीच कुजले पाहिजे.

शेणखत विसकटणे -
शेणखत योग्य पद्धतीने शेतामध्ये विसकटणे हे देखील महत्त्वाचे आहे. शेणखत हे पूर्ण शेतामध्ये एक समान विसरले गेले पाहिजे. काही ठिकाणी जास्त टाकणे, तर काही ठिकाणी कमी टाकणे असे होता कामा नये.

शेतामध्ये शेणखत कधी टाकावे -
नांगरटीच्या आधी शेणखत टाकणे आणि परत नांगरट करून रोटावेटर मारणे ,  ही पद्धत चुकीची आहे.
योग्य पद्धत काय आहे? तर, आधी नांगरट करून रोटावेटर मारून घ्यावे आणि शेणखत टाकून घ्यावे आणि त्या नंतर मग सऱ्या पाडाव्यात असे केल्याने शेणखत  मातीआड होते व पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यास मदत होते.