Wednesday, May 18, 2022

जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

कोरोना – आमच्या सिमला मिरचीचे 15 दिवसांत अडीच ते तीन लाखांचे नुकसान.. तरीही आताच्या प्राप्त परिस्थितीत LOCKDOWN ला पाठींबाच..! 

पण प्रश्न एकच – संकट कोणतेही असो प्रत्येक वेळी पहिला व सर्वांधिक आर्थिक फटका शेतकऱ्यालाच का बसतो…??? अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या नाशवंत शेतमालासह शेतकऱ्यांची फरफट अजून किती..?? पर्यायी व्यवस्था का नाही..??

खान्देशातील जळगाव जिल्ह्यात पॉलीहाऊस यशस्वी होत नाही.. होणार नाही हे भाकीत खोटं ठरवत वडिलांसह खान्देशातील शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून रंगीत ढोबळी मिरचीचा यशस्वी परिपाठ घालून दिला. वडिलांनी तर अर्ध्या एकरातून सलग 4 वर्षे विक्रमी 13 ते 15 टनांचे सरासरी उत्पादन घेत आदर्श उभा केला. तेही प्रती मिरची 250 ते 314 gm वजनासह अव्वल दर्जाचे उत्पादन..!!
सुरत बाजारात 15 दिवसांपूर्वी 65/70 रु किलो असलेले दर कोरोनामुळे कमी कमी होत रु 15 पर्यंत आले.. तोडा, वाहतूक व पोहोच परवडणार नसल्याने काही दिवस तोड थांबविली.. परिस्थिती सुधारली की पुन्हा दर वधारतील मग सारे सुरळीत होईल, हीच भाबडी आशा.. पण नंतर तर APMC च बंद केल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी खरेदीच थांबविली.. दरम्यान दिवसाचे उष्ण कोरडे तापमान वाढू लागले व जीवापाड कष्ट उपसून जपलेली, नियमीत water soluble fertilizer, spraying, आंतरमशागत असे as per schedule सर्व करून तयार झालेल्या बदामी आंब्याच्या आकाराच्या मिरच्या झाडावरच सुरकुतून गळून पडू लागल्या..

लाल व पिवळ्या मिरच्यांचा
जणू सडाच; मन सुन्न झाले..
वडिलांसोबत काल शेतात गेलो तर पॉलीहाऊसमध्ये लाल व पिवळ्या मिरच्यांचा जणू सडाच पडला होता.. ते पाहून अक्षरशः सुन्न झालो.. वडिलांकडे पहातच राहिलो.. ते स्थितप्रज्ञ.. त्यांनी चारपैकी दोन सुरू असलेले व्हॉल्व बंद करून दुसरे दोन सुरू केले.. बाकी शेताची पाहणी करून आम्ही घरी आलो.. मी बेचैन.. मुंबई, सूरतच्या व्यापाऱ्यांना फोन केले पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल बंद.. चायनीज गाड्या बंद, लग्नसराईचा सीझन असूनही लग्न कार्यालये बंद परिणामी या सीझनमध्ये 60/70 रु किलो प्रमाणे जाणारी मिरचीला खरेदीदारच नव्हते.. नेटवर dehydration unit ची माहिती search केली.. KF Bioplants चे संचालक किशोर राजहंस सो यांच्याशीही लागलीच चर्चा केली पण इतके instant solution व तेही अशा situation मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.. मलाही ते पटत होतं..

नुकसानीपेक्षा आता कोरोना
नियंत्रण महत्वाचं – वडील
वडिलांना नुकसानीबाबत विचारलं तर ते इतके सहज बोलले की जणू काही झालंच नाही (की त्यांना असे धक्के पचवायची सवय झाली..) वडील म्हणाले, “आता अडीच ते तीन टन माल तयार आहे.. ही मिरची वेळेत तोडली गेली असती तर एप्रिलअखेर अजून तितकाच माल तयार झाला असता. साधारण 5.50 ते 6 टन माल व रु 50/- चाही दर मिळाला असता तर अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न झाले असते.. आता पाहू किती मिळते ते.. पण आता या आपल्या नुकसानीपेक्षा कोरोना नियंत्रणात येणे जास्त गरजेचे आहे.. तेव्हा आता तुही उगाच जास्त tention घेऊ नकोस,” उलट असाच वडीलकीचा काळजी वजा सल्ला त्यांनी मलाच दिला.

प्रत्येकवेळी शेतकरीच का..??
स्पष्ट व पर्यायी व्यवस्था का नाही..??
कोरोना या संकटापुढे सारे हतबल आहेत. मात्र वर्षानुवर्षे कुठे संप झाला.. रास्ता रोको झाला.. दंगल झाली.. किंवा आणखी कोणतेही कारण असो पहिला फटका अत्यावश्यक वस्तू म्हणून गणल्या गेलेल्या नाशवंत अशा शेतमालालाच बसतो.. आधीच निसर्गनिर्मित संकट व त्यात मानवी हस्तक्षेपाने शेतकरी वैतागलाय.. असे बंदचे काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सर्व शासकीय यंत्रणेलाही तशा स्पष्ट सूचना देण्यात याव्यात व शेतमाल विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाही उभी करण्याची तजवीज करावी.. तूर्त कोरोनाच्या लढ्यास आमचा मनस्वी पाठींबा…

#मुख्यमंत्री_साहेब, हे दुष्टचक्र मोडण्याची आपल्याला अर्थात “शेतकऱ्यांच्या सरकार”ला एक संधी..

एक कृषी पत्रकार, संपादक म्हणून नव्हे तर एक शेतकरी पुत्र म्हणून शासनाला कळकळीची विनंती आहे की, शेतमाल हा नाशवंत असल्याने त्याची विक्री व्यवस्था सुटसुटीत व खात्रीशीर दर देणारी असावी. शेतकऱ्यांच्या हातात आलेला पैसा पुन्हा बाजारातच येतो. उदा. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांना योग्य दर मिळाला तेव्हा सर्वत्र मंदी असूनही शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी 100 हून अधिक ट्रॅक्टर खरेदी केले. थोडक्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेकडो नाही हजारो लोकांना रोजगार उपलब्धतेत हातभार लावला. आम्हाला पुरेशी वीज, पाणी, दर्जेदार बियाणे, निर्भेळ खते व फवारणी औषधे, शेतांतर्गत रस्ते, गोदाम व्यवस्था, योग्य दर मिळाला तर…. तर शेतकऱ्यांना कोणत्याही कर्जमाफीची गरज नाही. तेच पैसे पुढील चार वर्षांत उपरोक्त सुविधांसाठी पायाभूत सुविधा म्हणून खर्च करावेत, ही नम्र विनंती. शेतीला पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे दुग्धव्यवसाय, राजस्थानप्रमाणे घरटी शेळीपालन, मध्यप्रदेशप्रमाणे कुक्कुटपालनाला प्रोत्साहन तसेच त्या त्या भागांतील पीके identify करून प्रक्रिया उद्योगाची जोड देणे गरजेचे आहे. जेणेकरून नाशवंत अशा शेतमालाची Keeping Quality वाढून Value Addition देखील होईल. हे कळतं सर्वांना आहे मात्र आपल्या मंत्रालयातील Policy Maker यांना वळत नाही. कारण.. त्यांनाच माहिती..! साहेब, सर्व शेतकऱ्यांच्यावतीने मात्र एक खात्री देतो महाराष्ट्राला GDP मध्ये अव्वल आणून द्यायचे काम आमचा शेतकरीच करेल. फक्त शासन म्हणून योग्य संधी व प्रोत्साहनाची गरज आहे.
ना हारे हैं ना हारेंगे…
ना थके हैं ना थकेंगे…|
धन्यवाद..!! ????
एक शेतकरी पुत्र, – शैलेंद्र सुरेश चव्हाण, रा. म्हसावद (ता. जि. जळगाव)

( मुख्यमंत्री साहेब, आपण सत्तेचा अंकुश हातात घेतल्यावर “हे शेतकऱ्यांचे सरकार आहे,” असा आम्हाला विश्वास दिला होतात.. त्यासाठीच हा पत्रप्रपंच… )

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची