ओळख व नुकसानीचा प्रकार
शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर मोठ्या अळ्या शेंगांना अनियमित आकाराची मोठी छिद्रे पाडून आत शिरतात व शेंगा भरताना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत शेतात आढळतात. त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास 60-80 टक्के नुकसान होते. या कीडीचा जीवनक्रम 4 ते 5 आठवड्यात पूर्ण होतो .
एकात्मिक कीड व्यवस्थापन –
1) उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करूनच पेरणी करावी.
2) सलग तूर पेरतेवेळी तुरीच्या बियाण्यात 1 टक्का ज्वारी व बाजरीचे बियाणे मिसळून पेरावे. तुरीबरोबर ज्वारी, बाजरी, मका किंवा सोयाबीन ही आंतरपिके घ्यावीत.
3) बिजप्रक्रिया करून शिफारस केलेल्या वाणांचाच वापर करावा.
4)वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे. बांधावरील तणे काढून नष्ट करावीत.
5) पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ठ कराव्यात.
पीक फुलोर्यात व शेंगा भरताना कीड नियंत्रण
1) पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी 50 -60 पक्षीथांबे लावावेत.
2) हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत असताना हेक्टरी 5 कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) पिकांच्यावर एक फूट उंचीवर लावावेत.
3) तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.
4) पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क 5 टक्केची फवारणी करावी.
5) घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. (250 एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी प्रमाणे हेक्टरी 500 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी आणि त्यामध्ये नीळ 100 ग्रॅम टाकावी. ही फवारणी सायंकाळी करावी.
6) पीक 50 टक्के फुलोर्यात असताना मेटारायझीयम अॅनिसोप्ली हे बुरशीयुक्त किडनाशक 4 ग्राम 10 ली. पाण्यात मिसळून फवारनि करावी
गराजेनुसार खालील पैकी कीटकनाशकाची फवारणी करावी
शेंगा पोखरणारी अळीसाठी क्लोरपारीफॉस 20% प्रवाही 1250 मिलि यांची गरजेनुसार 500 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पॉवर स्प्रे साठी कीटकनाशकाची मात्र तीनपट करावी.
अळींचा प्रादुर्भाव खुप जास्त असल्यास 5 टक्के इमामेक्टीन बेन्झोएट 4 ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डीयामाईड (39.35 एस.सी.) 2 मि.लि. किंवा स्पिनोसॅड 45 एससी 3 मिलि किंवा क्लोरअॅट्रानिलीप्रोल 18.5 टक्के 3 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
कामगंध सापळे कोठे मिळू शकतात