नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा काढूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर गेला. यात नाल्याच्या काठावरील शेतजमीन पिकांसह खरडून गेली. आता या नुकसानापोटी पीकविमा मिळावा म्हणून शेतकरी शासनाच्या पीकविमा प्रतिनिधींकडे तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा काढूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
केंद्र आणि राज्यशासनासह कृषी विभागाकडून प्रधारनमंत्री पीक विमा योजना ही शेतकºयांसाठी वरदान असल्याचा गाजावाजा केला जातो. त्यावर विश्वास ठेवून लाखो शेतकरी दरवर्षी पिकांचा विमा उतरवितात. त्यासाठी नियमानुसार रकमेचा भरणाही करतात. यंदाही जिल्ह्यातील लाखावर शेतकºयांनी दिल्ली येथील अॅग्रीकल्चर कंपनीकडे पीकविमा काढला. त्यात मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील शेकडो शेतकºयांचा समावेश आहे. पीकविमा योजनेच्या नियमानुसार शेतकºयांच पिकांचे नैसर्गिक आपत्तीने अतोनात नुकसान झाल्यानंतर त्याची पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून पाहणी केली जाते. त्यासाठी शेतकºयांना पीकविमा कंपनीकडे ठरलेल्या मुदतीत तक्रारही नोंदवावी लागते. आता २६ आणि २७ सप्टेंबर रोजी इंझोरी परिसरातील नाल्याला मोठा पूर गेला. त्यामुळे या नाल्याच्या काठावरील अनेक शेतकºयांची शेतजमीन पिकांसह खरडून गेली. अनेक शेतकºयांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पीकविमा कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर शेतकºयांनी या संदर्भात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला; परंतु वारंवार प्रयत्न करूनही टोलफ्री क्रमांकावरून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आनंद तोतला या शेतकºयाचा टोलफ्री क्रमांकावर संपर्क झाला; परंतु त्यांनी पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाल्याची तक्रार केली असता, वेळ नसल्याचे सांगून तक्रार नोंदविण्यास प्रतिनिधीने नकार दिला.
शेतकºयांची पीक नुकसानाची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ होत असेल, तर संबंधित तालुका समन्वयकांवर नियमानुसार कारवाई करू, तसेच शेतकºयांच्या तक्रारी तातडीने नोंदवून घेण्याची व्यवस्था करू.
-ज्ञानेश्वर बोदडे जिल्हा समन्वयक
अॅग्रीकल्चर इंन्शूरन्स कंपनी नवी दिल्ली