Tuesday, January 31, 2023

“तुम्ही फोटो स्पर्धेत सहभागी झाले का?”

शेतीतील कीड रोगांची माहिती देताना उत्तम फोटोंची आवश्यकता खूप आहे, पण असा डेटा एकत्र कुठे उपलब्ध नाही. तुम्ही सगळे छान फोटो काढता तेंव्हा तुमच्या या कौशल्याचे इतर शेतकऱ्यांना सुद्धा नक्कीच उपयोग होऊ शकेल, आणि आम्ही त्यासाठी पुरस्कार सुद्धा देत आहोत.

होय आम्ही शेतकरी फाऊंडेशन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आयोजित केली आहे “पिकांच्या कीड-रोग फोटोग्राफीची स्पर्धा”.

यात आपणसुद्धा सहभागी होऊ शकता. यासाठी फक्त ३ स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत.

१) खालील लिंक वरून फार्म प्रिसाईज ही अँप इंस्टॉल कराhttps://play.google.com/store/apps/details?id=wotr.farmprecise&invitedby=HAS01

२) अँपवर स्वतःची माहिती भरून नोंदणी करावी

३) अँपच्या होम स्क्रीनवर असलेल्या फोटो स्पर्धा सेक्शनमध्ये आपली बेस्ट कीड-रोगाची फोटो शेअर करा.

झालं.

ही स्पर्धा २० सप्टेंबर पर्यंत खुली असेल. त्या अगोदर आपण सर्वजण यात सहभागी होऊ शकता.

मित्रांनो या अतिशय सोप्या पण महत्वाच्या स्पर्धेसाठी भरगोस बक्षिसे ठेवली आहेत जी आपल्या शेतीच्या कामात नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत.

????????प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे १ मानकरी शेतकरी/फोटोग्राफर मिळवतील १ पॉवर स्प्रेयर+ सन्मानपत्र

????????द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे २ मानकरी शेतकरी/ फोटोग्राफर मिळवतील प्रत्येकी १ नॅपसॅक स्प्रेयर+ सन्मानपत्र

????????तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचे ३ मानकरी शेतकरी मिळवतील प्रत्येकी १ फवारणीसाठीची पी पी ई किट + सन्मानपत्र

????????या प्रमुख ६ पुरस्कार व्यतिरिक्त पुढील १० विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि सन्मानपत्र देणार आहोत.

कृषी तंत्रज्ञान प्रसाराच्या कामातील महत्वाच्या बेस्ट क्वालिटी फोटो मिळवण्यासाठी नक्की मदत करा आणि मिळवा पुरस्कार.

धन्यवाद! ????????

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची