Saturday, October 1, 2022

जमीन सुधारण्यासाठी सबसॉयलरचा वापर कसा करावा?

सातत्याने पीक लागवड, पाण्याचा अति वापर आणि अयोग्य मशागतीमुळे जमिनी घट्ट बनत आहेत. अशा जमिनीत निचरा होत नसल्याने वाफसा येण्यास वेळ लागतो, यामुळे जमिनीची पूर्वमशागत, पिकाची आंतरमशागत चांगली होत नाही. परिणामी, कालांतराने जमीन घट्ट बनते. विशेषतः सात ते आठ इंच पृष्ठभागाखाली अत्यंत घट्ट असा थर तयार होतो. यामुळे पिकाला दिलेल्या जादा पाण्याचा निचरा होत नाही व हवा खेळती राहत नाही. जिवाणूंची संख्या घटते, क्षारांचे प्रमाण वाढू लागते, हवेचे प्रमाण कमी होऊन मुळांची वाढ कमी होते आणि याचा दृश्‍य परिणाम म्हणजे पिकांची वाढ खुंटते. विशेषतः उसासारखे दीर्घ मुदतीचे पीक घेण्याने, तसेच खोडव्याची एकापेक्षा जास्त पिके घेतल्यास ही समस्या वाढीस लागते. या समस्येवर उपाय म्हणजे सबसॉयलरसारख्या अवजाराचा वापर करावा. 

https://www.agrisearchindia.com/marathi/product/index/51

सबसॉयलरला “जमिनीची तळी फोडणारे नांगर’ असे म्हणतात. जमिनीच्या पृष्ठभागाखालून दीड ते दोन फूट (45 ते 60 सें. मी.) चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट (30 सें. मी.) लांबीचा असतो. हा नांगर ट्रॅक्‍टरच्या मागे जोडला जातो. हलक्‍या व कमी खोलीच्या जमिनीत 1.5 फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा. भारी, खोल जमिनीत दीड ते दोन फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालतो. नांगरटीपूर्वी पाच फूट अंतरावर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलरने ट्रॅक्‍टरच्या अश्‍वशक्तीनुसार दीड ते दोन फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते. 

सबसॉयलर चालविल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट थर फोडला जातो, त्यामुळे जमिनीत हवा भरून, माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते. जमिनीस वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते, त्यामुळे जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते. जमिनीची घडण, संरचना बदलते; जिवाणूंची संख्या वाढते. जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षारांचा निचरा होतो. जमिनीद्वारा पसरणाऱ्या किडींचे नियंत्रण होते. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते. सबसॉयलरचा वापर पावसाळ्यानंतर डिसेंबर ते एप्रिल महिन्याच्या कालावधीत करावा. सबसॉयलर वापरण्यापूर्वी जमिनीमध्ये पाण्याची पाइपलाइन असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावे, ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी. सबसॉयलर दोन ते तीन वर्षांतून एकदा वापरावा. सबसॉयलरचा वापर केलेली जमीन आठ ते 15 दिवस उन्हामध्ये तापू द्यावी, त्यानंतरच पुढील मशागत करावी. 

अधिक माहितीसाठी संपर्क अमोल पाटील- ९४०३९६४२९९ श्री.सुरेश कबाडे ९४०३७२५९९९

संबंधित लेख

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची