Saturday, October 1, 2022

विद्राव्य खतांच्या बोगस कंपन्यांना कसे ओळखावे आणि फसवणूक कशी टाळावी.

गेल्या चार पाच वर्षा पासून पाण्यात मिसळून देता येणाऱ्या खतांची मागणी खूप वाढलेली दिसून येते. ठीबक द्वारे किंवा थेट पिकावरून फवारून ही विद्राव्य खते देता येतात. पिकांच्या मुळाच्या वाढीसाठी , पिकाच्या वाढीसाठी ,फळाच्या उत्तम रंगासाठी आकारासाठी आणि चवीसाठी विविध प्रकारची विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहेत. थेट पाण्यातून देता येत असल्याने विद्राव्य खतांचा परिणाम इतर पारंपारिक खतापेक्षा चांगला दिसून येतो, म्हणून विद्राव्य खतांचा वापर दिवसे दिवस वाढत आहे. अजून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना विद्राव्य खतांची पूर्ण माहिती नसल्यामुळे विद्राव्य खतांच्या नावाखाली भेसळयुक्त पावडर विकली जाण्याचे प्रकार दिसून येत आहेत.

आज आपण ह्या लेखात विद्राव्य खतांची आणि आयात केलेली उच्च दर्जाची खते कशी ओळखावीत आणि फसवणूक कशी टाळावी ह्याची थोडक्यात माहिती घेऊ. विद्राव्य खते ही साधारण पणे नायट्रोजन , फोस्फारस , पोटशियम या तीन मुल्द्रव्यापासून तयार केलेली असतात. मोड आल्यापासून ते फळ धारणे पर्यंत पिकाच्या प्रत्येक अवस्थेसाठी ह्या तीन मुलद्रव्यांची बाकीच्या इतर उपयुक्त घटकाबरोबर विविध प्रकारे मिश्रण करून वेगवेगळ्या प्रकारची खते तयार करण्यात येतात. वर्षा नु वर्षे जमिनीत पिके घेतल्याने पिक्वाढीसाठी महत्वाच्या असणाऱ्या घटकांची मातीत कमतरता निर्माण होते त्याची भरपाई करण्यासाठी वेगवेगळ्या खतांची पिकांना गरज असते.

नायट्रोजन झाडांच्या प्रकाश संस्लेषण प्रक्रीयेसाठी खूप महत्वाचा घटक आहे. कार्बन डाय ओक्साईड आणि पाण्यापासून साखर आणि झाडाच्या वाढीसाठी लागणारी इतर प्रथिने तयार करण्यासाठी झाडांना नायट्रोजनची आवश्यकता असते.नायट्रोजनच्या कमतरतेमुळे उत्पादनात ३० ते ५० टक्क्यांनी घट होऊ शकते. फोस्फारस हा घटक मुळाच्या आणि फाद्यांच्या वाढीसाठी महत्वाचा असतो तर पोटशियम फळ धारणेत योग्य रंग आकार आणि चवीसाठी फार महत्वाचा असतो. विद्राव्य खते पावडर आणि द्रव अशा दोन्ही स्वरूपात उप्लब्ध आहेत. विद्राव्य खते किंवा त्याना तयार करण्यसाठी लागणारी मूलद्रव्ये महत्वाचे घटक प्रामुख्याने बाहेरच्या देशातून आयात केलेली असतात. आणि बाजारातील ह्या खतांच्या वाढत्या मागणीमुळे कधी कधी खतांची कमतरता भासते ह्याचा फायदा घेऊन काही बोगस कंपन्या भेसळयुक्त पावडर विद्राव्य खते म्हणून विकून भरघोस नफा मिळवायचा प्रयत्न करतात. अशा फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून विद्राव्य खते विकत घेताना काय काळजी घेता येईल त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.

आयात केलेल्या खतांच्या पिशवीवर उत्पादकाचे किंवा आयात करणाऱ्या कंपनीचे नाव व “DRC No. LFCD XXXXXXXX” असा उल्लेख आढळतो. बोगस कंपन्या काही पैसे भरून प्रशासनाकडून काही भामट्ये हा DRC No. मिळवतात व बाजारात भेसळयुक्त पावडर विद्राव्य खते म्हणून आकर्षक पिशवीमध्ये विक्री सुरु करतात.सर्वसामान्य शेतकरी गावातील कृषी सेवा केंद्रातून उसनवारी करून खते विकत घेतात पण ती खते खरच उच्च दर्जाची आहेत का याची तपासणी कशी हे माहिती नसल्याने फसवणुकीला बळी पडतात. तसं पाहता राज्य शासनाने व केंद्र सरकारने यावर कडक उपाययोजना केलेल्या आहेत पण शासकीय यंत्रणा प्रत्येक ठिकाणी तपासणी करू शकेल अशी शक्‍यता जवळपास दुरापास्त आहे.

यावर सर्वात सोपा व सरळ मार्ग म्हणजे आपल्या विक्रेत्या कडे आपण ज्या कंपनीचे खत विकत घेत आहोत ते खत क्षेत्रिय उर्वरक प्रयोगशाळा तुर्भे नवी मुंबई येथे नमुना तपासणी साठी दिलेले आहे का याची खातरजमा खात्री करणे अतिशय महत्वाचे आहे आणि क्षेत्रीय उर्वरक खात्याची प्रमाणपत्र प्रत्येक खत विक्रेत्याने शेतकऱ्यांना देणे आवश्यक आणि कायदेशीर रित्या बंधनकारक आहे अशा प्रमाणपत्राचा आग्रह प्रत्येक शेतकरी बांधवाने खत विक्रेत्याकडे करणे अत्यंत गरजेचे आहे. जर खते आयात केलेली असतील तर खत उप्तादक कंपनीकडे त्या खताचा RFCL च्या नमुना तपासणीचा J Form असणे बंधनकारक असते आणि जर खते भेसळयुक्त पावडर पासून तयार केलेली असतील तर ही कागदपत्रे खत उत्पादकाकडे नसतात, केवळ DRC No खताच्या पिशवीवर टाकून बोगस पावडर खताच्या नावाखाली विकून फसवणूक केली जात असते.

खते तपासणी –
१. युरिया : तपास नळीत १ gm युरिया, ५ ते ६ थेंब सिल्व्हर नायट्रेट, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिसळुन ढवळल्यास द्रावण पांढरे झाल्यास भेसळ आहे.

२. युरिया : १ gm युरिया तपास नळीत गरम केल्यास संपुर्ण युरिया विरघळला नाही तर भेसळ आहे.

३. DAP : १ gm DAP खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर, ०१ ml आम्ल मिसळून हलवा. संपुर्ण DAP विरघळला नाही तर भेसळ आहे.

४. म्युरेट ऑफ पोटॅश : ०१ gm खत, १० ml पाणी तपासनळीत घेऊन हलवून पाहिल्यास बरेच कण तरंगत असतील तर भेसळ आहे.
याशिवाय पेटत्या निखाऱ्यावर खत टाकल्यानंतर निखारा पिवळा झाल्यास भेसळ समजावी.

५. सिंगल सुपर फॉस्फेट :१ gm खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यामध्ये १ थेंब (२%) डिस्टिल्ड अमोनिअम हैड्रोक्साइड आणि १ ml सिल्व्हर नायट्रेट मिसळले तर द्रावनास पिवळा रंग न आल्यास भेसळ समजावी.

६. फेरस सल्फेट : १ gm खत आणि ५ ml पाणी मिसळा त्यात १ ml पोटॅशिअम फेरोसिनाईड मिसळल्यास मिश्रण निळे बनेल अन्यथा भेसळ समजावी.

इतकी वर्षे शेतकऱ्यांना काही बोगस बियाणे उत्पादकांनी नाडले यावर शेतकरी बांधवांनी वेळोवेळी आवाज उठवला होता त्यामुळे बियाण्यांचा गैरप्रकाराला बरयापैकी चाप लागला आहे. किटकनाशकांच्या बाबतीत देखील शेतकरी जागरूक झाला आणि लाखो करोडो रूपयांचे दावे जेव्हा या कंपन्यांवर दाखल झाले तेव्हा ही मंडळी सुधारली व बनवेगिरी थांबली. आता रासायनिक खतांच्या बाबतीत देखील होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अशीच जागरूकता दाखवली पाहिजे खत विकत घेताना खत उत्पादकाचा किंवा आयातदार कंपनीचा RFCL च्या नमुना तपासणीच्या J Form च्या प्रतीचा आग्रह नक्की करा. आणि जर याबाबत खत विक्रेता सहकार्य करत नसेल तर याबाबत आपण खत उत्पादनाचे नाव, खत विक्रेत्या दुकानाचे नाव आणि दुकानाचा परवाना क्रमांक पत्ता इत्यादी माहिती खालील पत्त्यावर पाठवून तक्रार करू शकता. मुख्य, गुणवत्ता नियंत्रण आधिकारी. कृषी आयुक्तालय, सेंट्रल बिल्डींग, पुणे ४१२००१

  • निरंजन माने

संबंधित लेख

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची