Friday, August 12, 2022

काढणी पश्चात पावसामुळे शेतकऱ्याला मिळू शकते पिक विमा नुकसान भरपाई

ह्या वर्षी उशिरा पाउस,अति वृष्टी,अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.दुर्देवाने नुकसान होत असतांना विधानसभा निवडणुक झाली.नंतर राजकीय पक्ष सरकार स्थापनेच्या मागे लागले. शेतकर्यांकडे लक्ष ध्यायला वेळ नाही. माझा शेतकरी बांधव सुध्दा नुकसान विसरून निवडणुकीत व्यस्त होता. आता नुकसान जास्त झाल्याने जागा झाला. दुसरे दुर्दैव्य असे की,याच कालावधीत दिपवाळीची सुटी लागली. राजकिय नेतृत्व निवडणुकीत व्यस्त, अधिकारी सुटीत व्यस्त .त्यामुळे शेतीच्या नुकसानीकडे लक्ष ध्यावयाला कोणालाही वेळ नाही. शेतकरी गोंधळलेला. याकरीता शेतकरीला पिक विमा नुकसान भरपाई व ओला दुष्काळ जाहीर करुन शासकिय मदतीची आशा. यात कोणीही जबाबदार सत्ताधारी पक्ष, अधिकारी वर्ग मार्गदर्शन करीत नाही. वास्तविक काढणी पश्चात पिक विमा नुकसान भरपाई मिळणेकरीता नुकसान झाल्याच्या ४८ तासाच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनी,कृषी विभाग कडे तक्रार करावयास पाहिजे. विमा कंपनींचे नाव,पत्ता, email id शेतकऱ्यांना माहीत नाही. सरकारी कार्यालयाला सुट्टी. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

यात भर म्हणुन गैरसमजापोटी “हुशार शेतकरी” शेतकऱ्यांचे गैरसमज वाढवत आहेत.व्हाटस् अपवर पोस्ट फिरत आहेत.शासनाने सरसकट सर्व शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई व ओला दुष्काळ मदत ध्यावी. यात काढणी पश्चात पिक विमा नुकसान भरपाई व ओला दुष्काळ शासकीय मदत स्वतंत्र विषय आहेत.शासकिय मदत ही नविन सरकार स्थापण झाल्यावर त्या सरकारने निर्णय घेतला तर मिळेल. त्याकरीता आपले राजकिय प्रतिनिधी, शेतकरी नेते यांनी शासनावर दबाव आणावयास पाहिजे. मात्र पिक विमा नुकसान भरपाई ही मार्गदर्शक सुचनेनुसारच मिळते. या अटी शर्ती प्रमाणेच नुकसान भरपाई मंजुर होते.ह्या अटी आता शासनही बदलु शकत नाहीत. त्यामुळे आपले शेतकरी बांधव शासनास आव्हान करतात की, शासनाने सरसकट पिक विमा नुकसान भरपाई मिळवुन ध्यावी. हे शक्य नाही. याकरीता वैयक्तिक शेतकऱ्याने पिक कापणी झाल्यानंतर पिक शेतात पडलेले असेल व अवकाळी पावसाने नुकसान झाले असेल तर विमा कंपनी,कृषी विभाग यांचे कडे गट नंबर,क्षेत्र,पिक, विमा हप्ता भरल्याची पावती,याची माहिती देऊन तक्रार करावयास पाहिजे. तक्रार न केल्यास त्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मंजुर होणार नाही. मात्र ज्या महसुल मंडळात अधिसुचित पिकाच्या क्षेत्रापैकी २५ टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तक्रार केली तर ते मंडळ नुकसान ग्रस्त जाहीर करुन सँपल सर्वे करून नुकसानीचा पातळी ठरवुन नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना मंजुर होते.

वैयक्तिक शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर १० दिवसात कंपनी प्रतिनिधी,कृषी अधिकारी, शेतकरी यांनी संयुक्तपणे केलेल्या पंचनाम्यात नुसार नुकसान भरपाई मंजुर होते. त्यानंतर १५ दिवसात नुकसान भरपाई दिली जाते. उदा.नुकसान ५०टक्के असल्यास व संरक्षित रकम ३०००० रु असल्यास १५००० रुपये नुकसान भरपाई देय होते. मात्र पिक कापणी प्रयोगाच्या आकडेवारी नुसार उंबरठा उत्पादन व जोखीम स्तर वरुन जी फायनल नुकसान भरपाई देय होईल, त्यातुन ही वाटप केलेली नुकसान भरपाई वजा केली जाईल.

  • कृषी भूषण अँड् प्रकाश पाटील पढावद ता शिंदखेडा जिल्हा धुळे

संबंधित लेख

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची