Tuesday, January 31, 2023

विक्रमी खोडवा उत्पादनासाठी खालील गोष्टी महत्वाच्या

15जून 2018ला बियाणेला तुटलेल्या खोडव्याचे तोडणी या वर्षी 2/1/2020 रोजी झाले.
एकूण 3एकर 19गुंठया मध्ये 391/017 मे.टन इतके उत्पादन मिळाले. एकरी ऊस उत्पादन 112/522 मे.टन मिळाले. सरासरी48ते 50कांडी पर्यंत ऊस वाढला होता. काही ठिकाणी 51/52कांडीचा ऊस सापडायचा. ऊसाची उंची वाडे सोडून19 ते21 फुटा पर्यंत गेली होती.

हा जो खोडवा होता तो 4.5 फूट जोड ओळ व7.5 फुटाचा पट्टा या पद्धतीने केलेला होता.(टीप:-या पद्धतीने सिंगल लॅटरल वापरून कर्नाटकचे शेतकरी विजय मगदूम यांनी आडसाली ऊसाचे उत्पादन एकरी 107 टन काढले)

https://gannamaster.com/product/mastercane/

प्रत्येक वर्षी मी co86032 या जातीच्या ऊसाचा बेणेमळा 4/5एकर क्षेत्रामध्ये करतो. तो ऊस 1जून ते 15 जूनच्या दरम्यान बियाणेस जातो.त्याचा खोडवा ऊस पुढील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये जातो.या कालावधीत त्याला 17/18महिने वाढीसाठी मिळतात. व खोडव्याला आडसाली ऊसा बरोबर दिवस मिळतात दोन पावसाळे सापडतात.ऊसाला जास्त दिवस मिळाल्यामुळे उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा होतो. व खोडव्याचे उत्पादन सहजा सहजी एकरी 100 टनाच्या वरती जाते.

आडसाली लागणीला एकरी 100टन काढण्याकरीता जेवढा खर्च येतो त्या तुलनेमध्ये खोडव्यापासून 100टन काढण्याकरिता उत्पादन खर्च फारच कमी येतो.जून महिन्यामध्ये बेणे प्लॉटची तोडणी झाल्यामुळे त्याला रासायनिक खतांचा डोसेस देत असताना आडसाली ऊसाइतके N. P. K. मात्रा देतो. खतांचे डोसेस देत 50टक्के सोईल मधून व 50टक्के ड्रीप मधून दिले.ड्रीप मधून खते देत असताना 12/61/0 ,युरिया,अमोनियम सल्फेट, पोटॅश , 0.0.50, व मैग्नेशियम सल्फेट ही खते दिली.
या प्लॉटला पहिल्यांदाच ठिबक सिंचनचा वापर केला. सिंगल लॅटरल न वापरता डबल लॅटरल (दोन्ही बाजूने)वापरले. त्यामुळे त्याला पाण्याचा ताण अजिबात बसला नाही.उन्हाळ्यामध्ये 2/3पाट पाणी दिले.

ऊसाची संख्या एकरी 43000 व वॉटर शूटची (कोंबरी) संख्या एकरी7000असे मिळून एकरी 50000पर्यंत होती. संख्या जास्त झाल्याने ऊसाला जाडी कमी आली.लहान असताना विरळणी करून संख्या एकरी 40000 च्या आसपास नियंत्रित केली असती म्हणजे ऊसाच्या जाडीमध्ये व वजना मध्ये अजून फरक पडला असता. परंतु काही कारणाने विरळणी करणे शक्य झाले नाही. अन्यथा अजून एकरी 10ते 15टनाने वाढ मिळाली असती.
त्यासाठी ऊसाच्या उत्पादनामध्ये योग्य वेळी योग्य संख्या नियंत्रण करणे फार गरजेचे असते.

श्री. सुरेश कबाडे.
✍️प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999

संबंधित लेख

2 COMMENTS

  1. नमस्कार!!!
    खोडवा उसाची विरळनी कशी करावी त्याचे काय गणित असावे या बद्दल एक वीडियो नक्की बनवा ….????????????????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची