Saturday, October 1, 2022

पुणे शहरात टपाल कार्यालयातून प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना व जन-धन योजनेचे पैसे काढण्याची सुविधा 

केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना व जन-धन योजनेचे पैसे लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु सध्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे पुणे शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू केलेली आहे. सद्य परिस्थितीत शहरातील भवानी पेठ, महात्मा फुले पेठ, गुरुवार पेठ, रविवार पेठ, संगमवाडी, सिंचन भवन, पर्वती, पौड फाटा, विश्रांतवाडी, टी.एम.व्ही. कॉलोनी, सैलीसबरी पार्क व शंकरशेठ रोड येथील सर्व बँकाच्या शाखामध्ये कामकाज बंद आहे.

पुणे  शहर  पश्चिम  विभागामार्फत  लाभार्थींना  सदर योजनेचा लाभ घेता यावा यासाठी पोस्ट ऑफिस मार्फत “आधार इनेबल पेमेंट सिस्टीम” (AePS) द्वारे पैसे काढण्याची सुविधा खालील पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. :-

पोस्ट ऑफिसचे नावदूरध्वनी क्रमांकइमेल
पुणे शहर प्रधान डाक घर,लक्ष्मी रोड020-24466660punecityho@indiapost.gov.in
शिवाजीनगर डाक घर, शिवाजीनगर020-25531130shivajinagarpuneso@indiapost.gov.in
पर्वती डाक घर, पुणे सातारा रोड020-24223216parvatiso@indiapost.gov.in

यासंदर्भात पुणे शहर पश्चिम विभागाचे प्रवर डाक अधिक्षक  श्री. अभिजित बनसोडे यांनी सांगितले की सदर पोस्ट ऑफिस च्या परीसरात्तील लाभार्थीना वरील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पैसे प्राप्त करून घेता येणार आहे.  सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे बँकेचे बचत खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तरी ज्या लाभार्थीचे बचत बैंक खाते आधार कार्डशी लिंक झालेले आहे  त्या  लाभार्थींनी  स्वत:  आधार कार्ड घेऊन पोस्ट ऑफिस मध्ये जाणे आवश्यक आहे.  तसेच जे लाभार्थी स्वत: पोस्ट ऑफिस मध्ये येण्यास असमर्थ आहेत ते वर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून पोस्टमन मार्फत त्यांच्या परिसरात पैसे प्राप्त करू शकतात. तरी लाभार्थींनी वरील पोस्ट ऑफिसेसला भेट देऊन अथवा संपर्क करून या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर डाक अधिक्षक श्री बनसोडे यांनी केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची