Thursday, June 30, 2022

लष्करी अळीवर नैसर्गिकरित्या वाढत आहे जैविक बुरशी

आज लष्करी अळी ने महाराष्ट्रात थैमान घातले असताना काही गोष्टी सकारात्मक देखील पुढे येत आहेत. कालच आमचे मित्र गणेश सहाने त्यांच्या जालना येथील मक्याच्या शेतात गेले असता मक्याच्या कणसावर त्यांना पांढऱ्या रंगाच्या आळ्या दिसून आल्या. गणेश ने आमच्या समूहावर फोटो पाठवल्यावर त्या अळ्यांवर नैसर्गिक रित्या नोमुरिया रिलाई या मित्र बुरशीची वाढ झालेली दिसली. गणेशच्या शेतात अशा बऱ्याच अळ्या दिसून आल्या आणि प्रायोगिक तत्वावर एक छोटासा प्रयोग देखील त्याने घेतला.

गणेश सहाने त्यांच्या जालना येथील मक्याच्या शेतातील जैविक बुरशीने

त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र मालेगावचे अधिकारी श्री विजय शिंदे यांना दहिवळ या गावात मक्‍याच्या कणसावर अश्याच पांढऱ्या रंगाच्या आळ्या दिसून आल्या. त्यासोबत खाली जमिनीवर देखील या अळ्यांचा सडा पडलेला दिसला. सदरच्या आळ्या नोमुरिया रिलाई या जैविक बुरशीमुळे मृत झालेल्या दिसल्या. नैसर्गिक रित्या अशा बुरशींची अळीवर वाढ होणे ही शेतकरी वर्गासाठी खूप सुखावह गोष्ट आहे. या पद्धतीने अळीचे लवकरात लवकर व्यवस्थापन होऊ शकते. सध्या पावसाची असलेली भुरभुर, 25 ते 28 सेल्सिअस दरम्यान असलेले तापमान आणि हवेमध्ये असलेली उच्च आद्रता या मित्र बुरशीच्या वाढीसाठी योग्य आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक रित्या या बुरशीची वाढ होताना दिसत आहे.

मालेगाव दहिवळ

शेतकरी मित्रांनो आपल्या ही मक्याचे निरीक्षण करा. अशा मित्र बुरशी ने प्रादुर्भावित आळ्या दिसत असल्यास हे नैसर्गिक नियंत्रणाचे उदाहरण आहे आणि कमी खर्चात लष्करी आळी चे नियोजन होऊ शकते. आपल्या शेतात जर असे कुठं दिसत असेल नक्की कळवा त्या बाबतीत आजून मार्गदर्शन करता येईल.

लष्करी अळीवर नैसर्गिकरित्या वाढत आहे जैविक बुरशी

फोटो- गणेश सहाणे आणि विजय शिंदे

  • डॉ. अंकुश चोरमुले किटकशास्त्रज्ञ, पुणे ८२७५३९१७३१

संबंधित लेख

4 COMMENTS

  1. एकटे Beauverua असलेले ब्रिगेड बी 1.15%वे.पा आणी बव्हेरीया +Metarrhizium दोन्ही किटनाशक बुरशा असलेले कॅनबायोसीस कं चे उत्पादन ब्रिगेड लिक्विड ए करी 1किलो 200-300ली पाण्यात अमावश्या पौर्णिैमेच्या 2दिवसापर्यत चिब फवारावे पोंग्यात व जमिनीवर पडेल ह्याची खबरदारी घ्या छान अवशेष विरहित चारा पिकासाठी ऊपयुक्त
    सोबत जस्त, मॅगनेशीयम व फेरसची पण बर्याच जमिनीत मकापिकावर कमतरता दिसते म्हणुन त्यामधे *ताबा 2मिली +इटीएम 1मीली/ली मिसळून फवारणी करा .
    सध्या किटनाशक बुरशासाठी वातावरण एकदम पोषक आहे .

  2. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या तालुक्यात व गावातील यालष्करी अळीचा बंदोबस्त करणेगरजेचे आहे नाहीतर भविष्यातील शेती उत्पादनावर त्याचा वाईट परीणाम भोगावे लागतील.

  3. लष्करी अळीवर बव्हेरिया आणि मेटारायझम ह्या बुरशी पण वाढतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची