Tuesday, January 31, 2023

सावधान!महावितरणचा डोळा शेतकऱ्यांच्या ऊस बिलावर!

मराठीत एक म्हण आहे ‘मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली’ असाच काहीसा प्रकार महावितरण सध्या करत असल्याचं चित्र दिसतय. एकीकडं अतवृष्टीनं राज्यातील शेतकरी कोलमडलाय. त्यातून वाचलेली पिक कवडीमोल दरानं जातायतं. काही पिकांना सध्या पाण्याची गरज असताना वीज कनेक्शन तोडली जातायेत. अशातचं महावितरणन शेतकऱ्यांना अडकवण्यासाठी एक नवा डाव टाकलाय. पण या राज्यातील शेतकरी भल्या भल्यांना पुरून उरलाय. त्यात महावितरण काय चीज. महावितरणचा डोळा आता राज्यातील ऊस उत्पादकांच्या बिलावर पडलाय

महावितरणणे साखर आयुक्तांना एक पत्र लिहलय. यामध्ये त्यांनी थकीत शेतकऱ्यांची लाईट बिले उसाच्या बिलातून वसूल करण्याबाबत सांगितलं आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिले वसुल करण्यास सांगितलंय. या जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जे शेतकरी येतात, त्यांची वीज देयके उसाच्या बीलातून वसूल करण्यास सांगणे म्हणजे शेतकऱ्यांचा हा विश्वासघात आहे. याबाबत साखर आयुक्तालयाने साखर कारखानदारांना एक पत्र लिहून बैठक देखील बोलावली आहे. महावितरणसंदर्भात पडलेला बेसिक प्रश्न म्हणजे ८ तासांची फुल लाईट असतानाही तिचा पूर्ण क्षमतेने विज पुरवठा होत नाही. यात पाच, सहा वेळा लाईट जाते. अशा वेळी शेतकऱ्यांची होणारी हाणी तुमच्या पगारीतून वसुल करुन घेतली तर चालेल काय? याच उत्तर महावितरणन आधी द्यावं.

साखर कारखानदारांनी FRP कडे लक्ष द्यावं!

मुळात साखर कारखानदार आणि महावितरणचा काही संबंध नाही. त्यांनी आपला नफा वाढवून शेतकऱ्यांची पूर्ण FRP कशी देता येईल, याकडं लक्ष द्यावं. शेतकऱ्यांच्या ऊस बिलावर डोळा ठेवणाऱ्या महावितरणला ठणकावून सांगायला हवं. आणि शेतकऱ्याचं पैसे कट करण्याचा नैतिक अधिकार ना कारखानदारांना आहे आहे, ना महावितरणला. त्यामुळं कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहावं, कारण तुमच्या कारखान्यातून जो धूर बाहेर निघतोय तो, उसाच्या जोरावरच निघतोय.

राज्य सरकार मध्यस्थी करणार की काडी टाकून शेकत बसणार?

आधीचं राज्यातील शेतकरी अतिवृष्टीनं संकटात सापडलाय. पावसामुळं पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय. आणखी काही शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात पाणी आहे. मुळात अशा शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पन्नात मोठी घट येणाराय. त्यामुळं हा फटका बसला असताना आता उसाच्या बिलावर जर महावितरणचा डोळा असेल तर शेतकऱ्यांसाठी हा दुष्काळात तेरावा असचं म्हणावं लागेल. त्यामुळं राज्य सरकार आता यामध्ये मध्यस्थी करणार की शेतकरी, महावितरण आणि कारखानदार यांच्यात काडी टाकून शेकत बसणार हे पाहावं लागेल. मात्र, जर सरकारनं यामध्ये मध्यस्थी केली नाही तर ऊस उत्पादकांच्या भडक्याला सरकारला सामोर जावं लागेल. आणि उस उत्पादक नाराज करणं हे महाविकास आघाडी सरकारला परवडणारं नाही.

(टिप- शेतकऱ्यांनी सावध राहावे, कारखानदार, महावितरणवाले आणि सरकार कधी डाका टाकतील हे सांगता येत नाही. तुम्ही सगळं जाणताचं पण माहितीस्तव. त्यामुळं होता होईल तेवढं याचा विरोध करा, बैठक झाल्यानंतर आणखी काही अपडेट मिळतीलचं ते देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.)

Ganesh Latake , Solapur

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची