Friday, August 12, 2022

धर्मांध होण्या पेक्षा सुज्ञतेत सर्वांचे हित आहे

मक्का (काबा), शिर्डी, तिरुपती बालाजी, जगभरातली चर्च, गुरुद्वारे इत्यादी सर्वच प्रार्थनाघरे बंद आहेत मग तुम्ही का अक्कल पाजळताय.

काही मुस्लिम बांधव एकत्र नमाज पठण करून कर्फ्युचे उल्लंणघन करत आहेत तसेच काही हिंदू बांधवही मंदिरात एकत्र फिरताना दिसत आहेत.

*कोरोनाचं संकट जात,धर्म,पंथ, देश ओळखत नाही मित्रांनो. थोडं डोक्यांनी विचार करा.*

सोशल मीडिया मध्ये काही मुस्लिम नमाजसाठी जमा होत असल्याचे अनेक व्हिडीओ फिरत आहेत. त्या सर्वांना विनंती आहे एकदा सोबत दिलेला पवित्र मक्का (काबा) चा फोटो पाहून घ्या. ते ही पहिल्यांदा निर्मनुष्य दिसत आहे. तुमच्या माझ्या पेक्षा त्यांना धर्म नक्कीच जास्त कळत असेल मग ते पवित्र मक्का जर का बंद ठेवत असतील तर मग मक्का कडे निय्यत बांधून एकत्र नमाज पठण करणारे आपण धर्म पंडित आहोत का? हाताच्या बोटावर मोजावीत इतकी काही दीड शहाणी मुस्लिम मोदीला विरोध करण्यासाठी कर्फ्युचे उल्लंघन करत एकत्र नमाज पठण करत आहेत त्यांना इतकंच सांगायचं आहे मक्काला मोदी नाही बरंका. त्याहून पुढे देशभर ज्यांना मानलं जातं ते मौलाना तारिक जमिल सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करत आहेत की एकत्र जमू नका. आमचं नाहीतरी त्यांचं तरी ऐका.

या लिंकवर मौलाना तारिक जमिल यांचा मुस्लिम बांधवांना संदेश पाहता येईल.

तसेच काल बिहारचे मुख्यमंत्री एकत्र मंदिरात गेले, काही हिंदू एकत्र गोमूत्र पार्ट्या करत आहेत, त्यांनाही विनंती आहे हे प्रार्थना स्थळांचे निर्मनुष्य फोटो पहा, थोडा नीट विचार करा आणि दीडशहाणपना बंद करा.

कोरोनाचे संकट अभूतपूर्व आहे. यात सर्वांनी एकत्र काळजी घ्यायची गरज आहे. कृपया घरीच रहा. स्वत:ची आणि आपल्या आप्तेष्टांची काळजी घ्या.

कृपा करून कुणीही अत्यावश्यक असल्या शिवाय घराबाहेर पडूनका. शासकीय निर्देशांचे पालन करा.

माणुसकीने आग्रह करणारा तुमचा मित्र

डॉक्टर विनोद चव्हाण????????

संबंधित लेख

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची