Saturday, October 1, 2022

वरोरा परिसरातील दर्जेदार कापसाला अमेरिकेत ‘डिमांड’

वरोरा व भद्रावती तालुक्यात अनेक वर्षांपासून दर्जेदार कापूस पिकविला जातो. ब्रिटीश काळातही या परिसरातील कापूस प्रसिद्ध होता. रेल्वेचे आगमन झाल्यानंतर या परिसरातील कापसाला इंग्लंडमध्ये मागणी वाढली होती, असे जाणकार सांगतात. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या भागात कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

वरोरा व भद्रावती तालुक्यात उत्तम दर्जाचा कापूस उत्पादन पिकतो. या कापसाला अमेरिकेत मागणी वाढू लागली. परिणामी, अमेरिकेतील इंडो काउन्ट इंडस्ट्रीजच्या वतीने दर्जेदार कापूस खरेदीसाठी यंदा पहिल्यांदाच येथील पारस अ‍ॅग्रो प्रोसेससोबत सामंजस्य करार करण्यात आला. यासंदर्भात नुकतीच एक कार्यशाळाही पार पडली. शेतकऱ्यांनी दर्जेदार कापूस उत्पादन कसे करावे, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या प्रकल्पातंर्गत प्रत्येक गावात १० प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

वरोरा व भद्रावती तालुक्यात अनेक वर्षांपासून दर्जेदार कापूस पिकविला जातो. ब्रिटीश काळातही या परिसरातील कापूस प्रसिद्ध होता. रेल्वेचे आगमन झाल्यानंतर या परिसरातील कापसाला इंग्लंडमध्ये मागणी वाढली होती, असे जाणकार सांगतात. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या भागात कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागतिक निकषानुसार येथील कपाशीला मागणी वाढू लागल्याने खरेदीसाठी अमेरिका सरसावली. मार्डा मार्गावरील पारस अ‍ॅग्रो प्रोसेसरच्या आवारात कापूस संरक्षण, गुलाबी बोंडअळी व कीटकनाशक फवारणी विषयावर जागृती शिबिर घेतले. या उपक्रमासाठी कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन टेक्सटाईल्स इंडस्ट्रिज, इको कॉटन इंडस्ट्रिज लिमिटेड मुंबई व बीसीआय कॉटन आदी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

१० गावे घेणार दत्तक
कापूस उत्पादन ते पक्का माल एकाच ठिकाणी तयार व्हावा. यातून शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, हा सदर कराराचा हेतू आहे. या प्रकल्पाला ‘गगन’ हे नाव देण्यात आले. प्रकल्पातंर्गत १० गावे दत्तक घेण्यात येणार आहेत. या गावांमध्ये सामाजिक उपक्रमांसोबतच कापूस लागवड, आंतरमशागत आदी विषयांसाठी १० प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. शेतकºयांना मोफत आरोग्य उपचार व रूग्णवाहिकाही उपलब्ध देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची