जगभरातील ग्राहकांची गरज लक्षात घेता अन्न पिकवण्यासाठी आदर्श शेती पद्धतीचा (Good Agricultural Practices) वापर ही काळाची गरज झाली आहे. बदलते हवामान, पिक पद्धतीनुसार किडींच्या प्रादुर्भाव बदलत आहे. अशा वेळी किडनाशकांचा वापर काटेकोर , समंजसपणे करायला हवा. तेंव्हाच आपल्या लोकांसाठी आरोग्यदायी अन्न पिकवणे आपल्याला शक्य होइल.
* किडनाशकांचा वापर अधिकृत (केंद्रीय कीडनाशक मंडळ व नोंदणी समिती) यांच्या शिफारशी नुसार करावा. शिफारस केलेला काढणीपुर्व काळ उलटल्यानंतर पिकाची काढणी करावी.
* ज्यावेळी इतर किड नियंत्रणाचे उपाय उपयूक्त ठरत नाहित, किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणाच्या पुढे जातो, अशा वेळी शिफारशीनुसार रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.
* किडनाशकांचा वापर विशिष्ट दिवसानंतर न करता गरजेप्रमाणे, किडींचा प्रकार , किडीची अवस्था व त्यांची संख्या (ईटीएल) याचा आधार घेवुन करावा.
* किडनाशकांचा वापर करित असताना नविन प्रकारातील आणि कमी मात्रा लागत असलेल्या कीडनाशकांचा शिफारसी नुसार वापर करावा.
* ज्या किटनाशकांच्या उत्पादनावर लाल त्रिकोण आहे अशांचा वापर कमी ठेवावा. निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या त्रिकोण असलेल्या किडनाशकांवर अधिक भर द्यावा.