Friday, October 7, 2022

नवरात्रीच्या उत्सवात केळी ही खाते भाव

पुणे – सर्वसामान्यांना परवडणारे फळ म्हणून केळीकडे पाहिले जाते. सध्या नवरात्रोत्सवाचे उपवास सुरू असल्यामुळे केळीला चांगलाच भाव आला आहे. बाजारात केळीची आवक चांगल्या प्रमाणात होत असली तरी मागणी जास्त असल्यामुळे केळीच्या भावात वाढ झाली आहे.

सध्या बाजारात तयार केळीला एक डझनास दर्जानुसार 40 रुपयांपासून 60 रुपये भाव मिळत आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डातील केळीबाजारात पुणे जिल्ह्यातून उरळी कांचन, इंदापूर तर सोलापूर भागातील अकलूज येथून दररोज आवक 10 ते 12 गाड्या म्हणजे सुमारे 100 ते 150 टन केळीची आवक होत आहे. दर्जेदार कच्च्या केळीस प्रतिकिलोस 16 ते 18 रुपये तर त्याखालोखाल हलक्‍या दर्जाच्या केळीस किलोस 13 ते 15 रुपये भाव मिळत
आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची