Monday, May 16, 2022

‘आताची घडी निसर्गासाठीची’ जागतिक पर्यावरण दिन 2020

दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरण जागरूकता, सार्वजनिक सहभाग व आपले पर्यावरण जपण्यासाठीचा पुढाकार यासाठी साजरा केला जातो. ‘आताची घडी निसर्गासाठीची’ या संकल्पनेवर आधारित, 2020चा पर्यावरण दिन वैशिष्ठ्यपूर्ण असेल, कारण यंदा तो डिजिटल व ऑनलाईन माध्यमांतून साजरा केला जाणार आहे.

जर्मनी व कोलंबिया एकत्रितपणे यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद सांभाळणार आहेत; अशी घोषणा संयुक्त राष्ट्र पर्यावरण संस्थेने गत वर्षी केली होती.

आपल्या ग्रहाची वैविध्यपूर्ण व भरभराट होणारी परिसंस्था निरनिराळ्या स्तरावर पूजनीय आहे; परंतु त्याचवेळी ती कधीही कोसळण्याजोगी देखील आहे. एकेकाळी हिरवेगार वन असलेले सहारा वाळवंट झाले, ‘ग्रेट बॅरीयर रीफ’ ही ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील प्रवाळ शैलमाला मृत होत आहे आणि आताची पिढी हे प्रवाळ पाहणारी कदाचित शेवटची पिढी ठरेल. निसर्गासाठीचा ‘विश्वव्यापी निधी’ अर्थात World Wide Fund for Nature (WWF) यांच्या ‘निवासी ग्रह’ या अहवालाप्रमाणे गेल्या 50 वर्षात अ‍ॅमेझॉन वर्षावन 80 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे; त्याचसोबत आपण 60 टक्के पृष्ठवंशीय वन्य जीवसंख्या गमावली आहे. अपृष्ठवंशीय जीवांची हानी इतकी आहे की आता ती केवळ जीववस्तुमानाद्वारेच प्रकट केली जाऊ शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या जर्मन अभ्यासकांनूसार केवळ गेल्या तीन दशकात 75 टक्क्यांपर्यंतचे किटकांचे जीववस्तुमान आपण गमावले आहेत.

लाखो वर्षांच्या उत्क्रांतीने सन्मानित परिसंस्थेचा शोध जो आपल्याला आश्चर्यकारक प्रेरणा देतो, तो अद्याप ‘जगण्यास सबळ तो तरणार’, या निसर्गनियमाप्रमाणे गेल्या काही दशकांच्या औद्योगिक हल्ल्यातून तग धरू शकलेला नाही. उत्क्रांतीचे हे विपुल ज्ञान वसुंधरेवरून कायमचे, वेगवान आणि अभूतपूर्व पातळीवर हटवले जात आहे, ज्याला “जीवनाचे वाचनालय जाळणे” म्हणतात. मानवांचा उदय झाल्यापासून जैवविविधतेत झालेली ही प्रचंड घट आता आणखीन मोठ्या प्रमाणात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे एक भूवैज्ञानिक नाव देण्यात आले- ‘सजीवसृष्टीचा विनाशक मानव.

जेव्हा जैवविविधतेचे नुकसान होते, तेव्हा पर्यावरणीय प्रभावांच्या लांबलचक यादीसह वातावरणातील बदल हे सारथ्य करताना दिसतात. पर्यावरणातील जैवविविधता आपल्या समजाहून कितीतरी अधिक महत्वपूर्ण आहे; दुर्मिळ प्रजाती, ज्या मानवाच्या खिजगणतीत नाहीत, त्या खरेतर परिसंस्थेचे संतुलन साधण्यात अत्यावश्यक भूमिका निभावतात. मानववंशविरोधी हिमस्खलन घटकांची पर्यावरणीय लवचिकता त्याच्या विविधतेवर अवलंबून असते. आपल्यातील किती जणांना हे माहित आहे की, कार्बन उत्सर्गाला आळा घालणाऱ्या ओक, शिसव, माहोगनी इ. कठीण लाकूड असलेल्या वृक्षांचे बीज वाहक बनून  ‘कोळी माकडे’ हवामान बदलाच्या परिणामास कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

जैवविविधता तीन परस्परावलंबी आधारस्तंभांची बांधणी आहे – परिसंस्था, प्रजाती आणि जनुके यांची विविधता. ते जितके अधिक एकमेकांत विणलेले असतात तेवढे जाळे अधिक मजबूत होते आणि एखाद-दूसरा जीव गमावल्यास पर्यावरणाची हानी होत नाही. कोणत्याही समृद्ध परिसंस्थेसाठी जैवविविधता एक स्पष्ट असा महत्त्वपूर्ण ताळेबंद आहे आणि त्याच्या संकुचिततेविरूद्धचा जणू विमा.

तथापि, विशिष्ट प्रजातींच्या अनुपस्थितीत पर्यावरणाची लवचिकता कोणत्याही वातावरणात खरी नसते; केवळ एक प्रजाती काढून टाकल्यामुळे संपूर्ण परिसंस्था कोलमडून जाते, उदाहरणादाखल प्रवाळ घ्या, त्यांना नष्ट केल्यास त्यांच्याशी संबंधित सर्व जीवजंतू यांचा नाश होतो, यांची ओळख आधारभूत प्रजाती म्हणून होते. म्हणूनच पर्यावरण आणि त्याची विविधता जपण्यासाठी एकत्रित व संघटित प्रयत्न केले पाहिजेत. निसर्गातील मानवी हस्तक्षेपांचे त्वरित आणि अनावश्यक परिणाम देखील होऊ शकतात, अधिवास नष्ट होणे आणि अतिक्रमणे यांमुळे कोविड19 सारख्या साथीच्या आजारांतून मुक्त होऊ शकतो. हवामानातील बदलामुळे आणि तापमानवाढीमुळे ध्रुव प्रदेशाकडील कायम गोठलेली जमीन आणि बर्फ उच्च अक्षांशांवर वितळत असताना, सुप्त व बर्फाखाली दाबलेले प्रतिजैविक प्रतिकारासह एकत्रित विषाणू, जे आता वैद्यकीय जगाला त्रास देत आहेत, जागृत होतात; आता केवळ येणारा काळच सांगू शकेल की, हे सर्व कीती खोल परिणाम करणार आहे.

कदाचित आपण प्रवाळ पाहणारी शेवटची पिढी असू शकतो, पण निसर्गाचे मूल्य आणि आपला त्यावर असणारा प्रभाव यांचे स्पष्ट चित्र देखील समोर असणारी आपण पहिली पिढी आहोत. आर्थिक गणित मंडल्यास, जागतिक स्तरावर निसर्ग आपल्याला वर्षभरात अंदाजे 125 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या सेवा देतो. या ग्रहाच्या इतिहासामध्ये कधीच एखाद्या प्रजातीकडे असे ज्ञान आणि तंत्रज्ञान नव्हते, जे, ते राहत असलेल्या पर्यावरणाचे नाजूक संतुलन पूर्वपदावर आणू शकतील.

संयुक्त राष्ट्र महासभेने 2021 – 2030 हा काळ परिसंस्था पुन:स्थापना संयुक्त राष्ट्र दशक म्हणून घोषित केले आहे, ज्याचा हेतू, हरवलेले जग पुन्हा प्राप्त करण्यासाठी अभूतपूर्व आंतरशासकीय प्रयत्न करणे असा आहे. भारत सरकार हवामान बदलावर त्वरित काम करणार्‍या देशांपैकी एक आहे. आठ मोहिमांसह हवामान बदलांची राष्ट्रीय कृती योजना, आपल्या हवामान बदल धोरणाचा कणा आहे. हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या रचनेला सादर केलेली भारताची उद्देशपूर्ण राष्ट्र निर्धारीत बांधिलकी कोणत्याही विकसनशील देशासाठी अजोड आहे. सन 2030 पर्यंत आमच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या उत्सर्जनाची तीव्रता 2005च्या पातळीहून 33 ते 35 टक्क्यांनी कमी करण्याचे आम्ही वचन दिले आहे, याचा अर्थ असा आहे की, आपल्या जीडीपीच्या प्रत्येक अतिरिक्त रुपयासाठी हळूहळू कमीतकमी ऊर्जा खर्च करणे.

भविष्य अद्याप अस्पष्ट नाही; काय करावे आणि काय करू नये, याचे स्पष्ट चित्र आपल्यासमोर आहे. कोविडची साथ आणि येणा्या टाळेबंदीने आपल्याला दाखवून दिले आहे की, संधि मिळाल्यास निसर्ग कसा उलटतो, निसर्गाने आम्हाला दिलेले हे आश्वासन आहे आणि तीच आपली एकमेव आशा आहे.

डीव्ही विनोद कुमार (लेखक भारतीय माहिती सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी मांडलेले विचार हे त्यांचे वैयक्तीक आहेत.)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची