आज विधिमंडळात सर्व आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी जे सतत लढत असतात असे बच्चू कडू यांनी शपथ घेतली. बच्चू कडू सत्तेत सहभागी असून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी बच्चू कडू सतत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. शपथेचा शेवटी त्यांनी जय जवान! जय किसान! नारा दिला.
ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्याचे नाव ओमप्रकाश कडू असे आहे. तसेच ‘प्रहार जनशक्ती पक्षाचे’ ते संस्थापक अध्यक्ष आहेत. प्रहारच्या माध्यमातून युवकांचे संघटण करुन त्यांनी स्थानिक प्रश्न आक्रमकपणे समोर आणले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात त्यानी केलेल्या शोले आंदोलनाने ते विशेषतः प्रसिद्धीस आले