Saturday, October 1, 2022

4.09.2020 पर्यंत विक्रमी 1095.38 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरण्या

सरकारकडून बियाणे, कीटकनाशके, खते, यंत्रसामग्री आणि पतपुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्याने लॉकडाऊन काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरणी शक्य- कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

चालू खरीप हंगामात विक्रमी 1095.38 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. भाताची पेरणी अद्याप सुरु असून दली डाळी, भरड धान्य, बाजरी, तेलबिया यांची पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. आतापर्यंत खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्राच्या प्रगतीवर कोविड-19 चा परिणाम झालेला नाही. 

सरकारकडून बियाणे, कीटकनाशके, खते, यंत्रसामग्री आणि पतपुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्याने महामारीमुळे लागू झालेल्या  लॉकडाऊन काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरणी शक्य झाल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. सरकारच्या योजना आणि मिशन कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारांचे  सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. वेळेवर कृती, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे श्रेय त्यांनी शेतकऱ्याना दिले. खरीप हंगामाच्या पेरणीसाठीची अंतिम आकडेवारी 2 ऑक्टोबर 2020 ला बंद होईल. खरीप पिकांच्या पेरणीच्या  क्षेत्राची स्थिती  याप्रमाणे- 

  • तांदूळ : 396.18 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 365.92 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 8.27%. वाढ. 
  • डाळी : 136.79 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 130.68 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 4.67%.वाढ. 
  • भरड धान्य : 179.36 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 176.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 1.77%,वाढ. 
  • तेलबिया : 194.75  लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 174.00 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 11.93%,वाढ. 
  • ऊस : 52.38 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 51.71 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 1.30%वाढ. 
  • कापूस : 128.95 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 124.90 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 3.24%वाढ. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची