Saturday, October 1, 2022

“३ एकर पडीक जमिनीवर जैविक पद्धतीने शेती करून कुक्कुटपालन व मधुमक्षिका पालन करणारे कर्नाटकचे लक्ष्मीकांत हिबारे”

कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्यातील हागरगा या गावी राहणारे लक्ष्मीकांत हिबारे हे एक प्रगतीशील शेतकरी असून मागील काही वर्षांपासून ते जैविक पद्धतीने शेती करत आहेत. शेती करण्यासाठी लक्ष्मीकांत यांनी जंगल पद्धती अवलंबली असून या पद्धतीने शेती करून ते चांगला नफा कमावतात.


आज एक यशस्वी शेतकरी असण्याबरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे.
आज हिरवीगार दिसणारी त्यांची शेती कधीकाळी पडीक होती. त्यांच्या भागात पाण्याची कमतरता होती परंतु मेहनत व कष्ट यांच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले आहे.


शेती बरोबरच एका शाळेत टायपिस्ट म्हणून नोकरी करणारे लक्ष्मीकांत हिबारे मूळ महाराष्ट्रातील असून वडील लहान असताना सर्व कुटुंबीय कर्नाटकला स्थायिक झाले होते. कर्नाटकला जमीन घेऊन लक्ष्मीकांत यांनी दहावीपर्यन्त शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर टायपिस्ट म्हणून नोकरीला लागले.
हिबारे यांच्या वडिलांनी ७ एकर जमीन खरेदी केली त्यातील फक्त ३ एकर जमीन उपजाऊ होती तर उर्वरित जमीन पडीक होती व हीच पडीक जमीन लक्ष्मीकांत यांच्या वाट्याला आली होती.
या पडीक जमिनीवर आजपर्यंत काहीही पिकले नव्हते.


सुरवातीला मातीचा पोत सुधारण्यासाठी जैविक खतांचा वापर त्यांनी केला त्यासाठी शेण, गोमूत्र, पालापाचोळा याचा वापर त्यांनी केला.
जमीन व्यवस्थित तयार झाल्यानंतर हिबारे यांनी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले व त्यांनी जंगल पद्धतीने शेती करण्याचा सल्ला हिबारे यांना दिला.
यानंतर हिबारे यांनी कर्नाटक व हिमाचल प्रदेशमधील वनविभागाकडून तीन हजारपेक्षा अधिक झाडे खरेदी केली. त्यामध्ये चंदन, शेवगा, रक्तचंदन, आवळा, मोसंबी, आंबा, संत्री व निंबू यासारख्या झाडांचा समावेश आहे. शेतीच्या चारही बाजूला त्यांनी लिंबाची झाडे लावली.


याव्यतिरिक्त हिबारे भाज्या व फुलांची देखील लागवड करतात व त्यापासून त्यांना कमाई देखील होते.
हिबारे सांगतात की, त्यांच्याकडे पाण्याची समस्या असून त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. आज त्यांच्या शेतात बोरवेल असून पाणी साठवण्यासाठी तलाव देखील बनवला आहे.
जैविक खते बनवण्यासाठी ओला कचरा, माशांचे अवशेष, शेण व गोमूत्र यांचा वापर हिबारे करतात.
जंगल पद्धतीने शेती करून यश मिळाल्यानंतर हिबारे यांनी दुसऱ्या तंत्रज्ञानावर काम सुरु केले आहे.शेतीवरच त्यांनी एक नर्सरी चालू केली असून चंदन, काटीकरंज, मोहगणी यासारखी रोपे या नर्सरीमध्ये तयार केली जातात.नर्सरीबरोबरच कुक्कुटपालन व मधुमक्षिका पालन देखील हिबारे यांनी चालू केले आहे.


मार्केटिंगसाठी हिबारे फक्त बाजारपेठेवर अवलंबून नसून त्यांनी थेट ग्राहकांना माल पुरवण्याची सुविधा तयार केली आहे.
वर्षाला जैविक शेती, नर्सरी, कुक्कुटपालन व मधुमक्षिकापालन यापासून हिबारे यांना लाखोमध्ये कमाई होते.
बँक ऑफ बरोडाकडून ‘श्रेष्ठ कृषी सन्मान’ हिबारे यांना मिळाला आहे. हिबारे स्वतः तर शेती करतातच परंतु आपल्या मुलांना देखील ते शेतीमधील सर्व कामे शिकवतात. जैविक शेती करण्यासाठी मेहनतीची गरज असते परंतु एकदा का जम बसला त्यानंतर मात्र कमाई योग्य प्रकारे होते असे हिबारे सांगतात.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची