Friday, May 20, 2022

..हिरवळीचे खते..

हिरवळीची खते सेंद्रिय पदार्थ तसेच पिकांच्या अन्नद्रव्यांचा जमिनीतील साठा वाढावा यासाठी हिरवे पिक जमिनीत गाडण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अशा प्रक्रियेतून तयार झालेल्या खतांना हिरवळीचे खत वा बिवड म्हणतात. पावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरले जाते, व तयार झालेले पिक जमिनीत गाडले जाते. बरयाचदा करंज, भेंड, अंजन व ग्लीरीसिदिया या वनस्पतीची पानेही जमिनीत गाडली जातात.

हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके/वनस्पती व त्यातील नत्राचे प्रमाण

पिकाचे नाव नत्राचे शेकडा प्रमाण ताग (भोरू) ०.४६ चवळी ०.४२ गवार ०.४९ सुर्यफुल ०.४५ हरभरा ०.५० सोयाबीन ०.७१ उडीद ०.४७ मटकी ०.३५ लसून घास ०.७३ करंज २.६१ अंजन १.४२ ऐन २.०४ भेंड २.९० गिरिपुष्प २.७४

हिरवळीचे खत तयार करताना घ्यावयाची काळजी

पिक लवकर भरपूर वाढणारे असावे. पिक रसरशीत व तंतूचे असावे ज्यायोग्य ते लवकर कुजते. पिक कोणत्याही जमिनीत वाढणारे व शक्यतो शेंगाकुलीतील असावे. पिकामुळे जमिनीवर वाईट परिणाम होऊ नये. पिक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ते जमिनीत गाडावे. पिकला सिंचनाची सुविधा असावी, म्हणजे पिक साधण्यास मदत होते.

हिरवळीचे खते

हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास “हिरवळीचे खत “असे म्हणतात.

हिरवळीच्या खताचे फायदे

• ही ळते जवळजवळ प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्राचे योगदान करते .
• फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते .
• मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते .
• मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते
• मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.
• सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते .या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .

हिरवळीच्या खतांचे प्रकार

हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत .

१) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :- जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.

२) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .

हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती

१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .
२) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.
३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल .
४) शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल .
५) कपाशीच्या रांगामध्ये तूणधान्य ,शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन ह्या पिकांच्या कापणी नंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे ,उत्तम हिरवळ खत म्हणून कपाशीवर ह्याचा परिणाम दिसून येतॊ . सोयाबिन ,तूर व ज्वारी सोबत पेरून ,सोयाबीन हिरवळखत म्हणून वापरता येईल ;ज्वारी व तूर ह्यांचे उत्पादनात वाढ होईल .

हिरवळीच्या खतांची पिके

१) ताग / बोरु – ताग हे हिरवळिचे उत्तम खत आहे .ज्या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घेण्यात यावे .सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मिय जमिनीत या पीकांची वाढ जोमाने होत नाही .तसेच पाणी साचून राहणा-या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही .पावसाळ्याच्या सुरूवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे .पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो-यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० से .मी .उंच वाढली असतांना नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकावे .तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते .
२) धैचा – तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी ,पर्जन्यमान ,पाणथळ ठिकाण ,क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुध्द हे पिक तग धरु शकते .या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात .या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियोणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे . बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझॊबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से .मी .उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे .या काळात धैच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते .या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ ट्क्के इतके आहे .भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते .
३) घेवडा :- हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते .पाणथळ जमीनीस हे पीक योग्य नाही .पावसाळ्याच्या सुरूवातील प्रती हेक्टरी ५० किलो बियोण पेरावे .नतर आँगस्टच्या दुस-या आठवड्यात ते जमिनीत गाडावे .
४) सेंजी :- रब्बी हंगामासाठी हे उपयुक्त हिरवळीचे खत आहे . सिचनाची सोय असलेल्या ठिकाणी हेक्टरी ३०त े ४० किलो बियाण्याचा वापर करून पेरणी करावी .जानेवारीच्या अखेरीस जमिनीत गाडण्यास ते योग्य होते.उसाच्या पिकास ते योग्य हिरवळीचे खत आहे .
५) द्विदल कडधान्याची पिके :- पावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग ,चवळी ,उडीद ,कुळी्थ ,गवार ,यांचे बियाणे शेतात पेरले असता या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतासाी चांगला उपयोग होतो जमिनीची पुर्व मशागत केल्यावर मूग ,उडीद ,कुळीथ यासाठी २५ ते ३० कि .ग्रँ . प्रति हेक्टरी बियाणे पेरावे पेरणीपुर्वी बियाण्यास राय़झॊबियम जीवाणु चोळूण आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात .पीक फुलो-यावर येण्यापुर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० कि .ग्रँ .नत्र पिकास उपल्ब्ध होतो.
६) गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया) – झुडुप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच निरनिराळ्या पर्जन्यामानाच्या प्रदेशात चांगले येते .या झाडाची लगवड दोन प्रकारे करतात .पहिल्या पध्दतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० से .मी . लांब ३ सेमी .व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरुवातीस ३० x३० x ३० सेमी .आकाराचा खड्डा करून बाधावर अथवा पडीक जमिनीत लगवड करावी .दुस-यापध्दतीत गादी वाफे तयार करून अथवा प्लँस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावे .ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत .पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून दुस-या वर्षापासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो .या झाडाच्या फांद्याची वरचे वर छाटणी करूनही या झाडांना नवीन फूट येते आणि त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते .गिरीपुष्पाची पाने धैचा .मेंड व वनझाडाचा पालापाचोला यापेक्षा जलद कुजतात .गिरीपुष्पाच्या पानांम्ध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते .सेंद्रिय कर्ब ३६ टक्के ,नत्र २. ७० टक्के ,स्फूरद ०. ५ टक्के व पालाश १ .१५ टक्के आहे म्हणून नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करण्यासाठी गिरीपुष्प हिरवळीच्या खतांचा मोठा सहभाग आहे .

सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याच्या शेतक-यांचे हिरवळीच्या खतांचे प्रयोग

काही सेंद्रिय शेतक-यानी हिरवळीच्या खतांचे अनेक प्रयोग पीक उत्पादनातील वाढ अनुभवली आहे . जागेवरच हिरवळीच्या खतांची लगवड करण्याच्या प्रयोगात तीन फुट अंतरावर कापूस किंवा तुराची पेरणी करून पिकात मूग , उडीद ,अशी अल्प मुदतीची पिके घेऊन त्यामुळे निर्माण होणा-या हिरवळीचा फायदा मुख्य पिकाला होतो . पाँण्डेचरीमधील आँरव्हिले या गावी मिश्न बियाणे पेरुन २५ ते ३० दिवासांनी जागेवरच गाडून त्यापासून खत व आच्छादन म्हणून वापर केला जातो .काही शेतकरी पिकांच्या दोन ओळींमध्ये एकदल ,द्विद्ल तेलबिय ताग ,धने इत्यादी सर्व प्रकारचे बी एकत्र मिसळून एकरी १० कि .ग्रँ .या प्रमाणात फेकून मातीने झाकतात पेरणीनंतर ३० दिवसांनी मुख्य पीक स्वच्छ ठेवून नंतर अ‍ॅरोग्रीन पेरावे व ते मूळ पिकापेक्षा उंच होऊ लागले की जागेवरच पाडावे .अशाप्रकारे १० किलो बियाण्यांपासून ४ ते ५ टन हिरवळीचे खत मिळते .या हिरवळीच्या खताचे पूथ:करण केले असता त्यापासून एकरी ४० किलो नत्र उपलब्ध होतो शिवाय यासाठी लागणारा खर्चही कमी असून आपल्या शेतात अधिकधिक जैविक विविधता निर्माण करून पिकांना आवश्यक असणा-या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविता येते.


डॉ. ओमप्रकाश हिरे
डॉ. विश्वजित कोकरे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची