Monday, May 23, 2022

हवामान अंदाज- पुढील आठवडा वादळी पावसाचा

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) यंदाच्या हंगामात दमदार पाऊस कोसळला. राज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. यातच राज्यात मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला असताना उद्यापासून (ता. ४) पावसाला पोषक हवामान होत आहे. पुढील आठवड्यात राज्यातील विविध भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. या काळात मेघगर्जना, विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की मॉन्सूनने अद्याप परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. महाराष्ट्रातूनही साधारणत: १५ तारखेनंतरच मॉन्सून माघारी फिरण्यास सुरवात होईल. दरम्यानच्या काळात ४ ते ८ या कालावधीमध्ये राज्यात वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणाच्या दक्षिण भागात चांगला पाऊस अपेक्षित असून, उर्वरित महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. तसेच काही ठिकाणी कमी काळात जोरदार पावसाच्या सरी येतील. तसेच १५ तारखेपर्यंतदेखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस कमी होणार असला तरी आठवडाभर (२२ ऑक्टोबरपर्यंत) पश्‍चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले.

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, की ६ आॅक्टोबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्याने सोमवारपासून (ता. ७) ते शनिवारपर्यंत (ता. १२) महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. यातही बुधवारी (ता. ९) आणि गुरुवारी (ता. १०) पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यात भात, मका, सोयाबीन, कापसासह खरिपाची पिके परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. राज्यातील वादळी पावसाची शक्यता विचारात घेता, मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने काढणीस आलेल्या, साठवून ठेवलेल्या शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची