Saturday, May 21, 2022

सांगलीच्या कवलापूरच्या गाजराची चवच न्यारी, काय आहे गावच्या पाण्याचा गुणधर्म, वाचा सविस्तर

मिरज तालुक्यातील कवलापूरच्या गाजरांची काय आहे अजब कहाणी ते आपण पाहणार आहोत. कवलापूर हे तसं द्राक्ष उत्पादकांच गाव. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गावच्या शिवारात गाजराचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. त्यासाठी निमित्त ठरलं आहे ते गावचं पाणी. गावच्या सवाळ पाण्यामुळेच येथील गाजराला वेगळी चव असून सध्या मकरसंक्रातीच्या निमित्ताने राज्यभर तर मागणी राहतेच पण कर्नाटकमध्येही या गाजराची निर्यात केली जाते.

एखाद्या फळाची चव हे त्या गावचे वेगळेपण सांगते. अशी काही निवडकच उदाहणे असतात त्यापैकीच कवलापूरची गाजरं समोर येत आहेत. यातच आता  मकर संक्रातीचा सण तोंडावर आल्याने या गावच्या गाजरांची चर्चा सबंध पंचक्रोशीत होत आहे. मिरज तालुक्यातील कवलापूरच्या गाजरांची काय आहे अजब कहाणी ते आपण पाहणार आहोत. कवलापूर हे तसं द्राक्ष उत्पादकांच गाव. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गावच्या शिवारात गाजराचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. त्यासाठी निमित्त ठरलं आहे ते गावचं पाणी. गावच्या सवाळ पाण्यामुळेच येथील गाजराला वेगळी चव असून सध्या मकरसंक्रातीच्या निमित्ताने राज्यभर तर मागणी राहतेच पण कर्नाटकमध्येही या गाजराची निर्यात केली जाते. लागवडीपासून ते बाजारपेठेचा शोधही शेतकरीच घेत असल्याने तीन महिन्याच्या कालावधीत उत्पन्न पदरी पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

काय आहे कवलापूरच्या गाजराचं वेगळेपण?

द्राक्ष उत्पादन घेत असलेल्या कवलापूरची ओळख आता गाजराचं गाव म्हणून होत आहे. या गावच्या सवाळ पाण्यातच वेगळेपण असल्याने गाजराची चव न्यारी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. विशेषत: संक्रातीच्या सणामध्ये तर या कवलापूरच्या गाजराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. संक्राती सणाच्या तोंडावर गाजराची विक्री करता यावी त्याच अनुशंगाने लागवडही केली जाते. कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न म्हणून गाजर लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यामधून शेतकऱ्यांचे अर्थार्जन तर होत आहे पण एका खेडेगावातली गाजरे ही कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागातून मागणी होत आहे.

देशी आणि सेंद्रीय गाजर

कवलापूरात कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता गाजराचे उत्पादन घेतले जाते. शेणखंत आणि सवाळ पाण्याचे योग्य नियोजन करुन केवळ तीन महिन्यात गाजराचे उत्पादन घेतले जाते. तीन महिन्याच्या या कालावधीत विविध प्रक्रिया पार पडल्यानंतर हे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडते. सेंद्रीय पध्दतीने या पिकाचे उत्पन्न घेतले जात असल्याने वेगळे महत्व आहे. असे असताना लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. एवढेच नाही ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणीही मध्यस्ती नसून शेतकरी स्वत:च गाजराची विक्री करतात. गाजर धुण्यासाठी तर गावात पाण्याचे मोठे टॅंक बनवले आहे. रोलर मध्ये गाजरे टाकून ती स्वच्छ धुतली जातात. यंदा सध्या गाजराचा दर किलोला 22 ते 23 पर्यत गेला असून पुढच्या दोन तीन दिवसात हा दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे

आरोग्यासाठी कवलापूरचे गाजरं उपयोगी

गाजर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजरातुन अनेक व्हिटॅमिन देखील मिळतात. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर उपयुक्त ठरतं ते म्हणजे गाजर. डोळ्याच्या आजारावर देखील गाजर उपयुक्त आहे. त्यामुळे कवलापूर हे गाव या उपयोगी गाजराची शेती म्हणून प्रसिद्ध आहे. आज द्राक्षाबरोबरच कवलापूर मध्ये गाजर शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतात गाजर लावण्यापासून ते 3 महिन्यांनंतर हे गाजर काढून ते स्वच्छ धुवुन बाजारात विक्रीस पाठवण्यापर्यतची सगळी यंत्रणा गावातच आहे.

स्रोत tv9 मराठी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची