Wednesday, May 18, 2022

शेतीच्या रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस कायदे महत्वाचे- डॉ अंकुश चोरमुले

शेती म्हणलं की त्या शेतीला रस्ता हा हवाच. बियाणे वाहतूक असेल रासायनिक खतांची वाहतूक असेल किंवा तयार होणारे उत्पादन जर शेतातून बाहेर काढायचे असेल तर शेताला रस्ता हा हवाच. आज बरेच शेतकरी शेतीच्या रस्त्याच्या समस्येच्या गर्तेत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना शेतामध्ये जायला रस्ता नाही किंबहुना रस्ता जरी असेल तरी काही शेजारीपाजारी मुद्दामहून एखाद्या शेतकर्याचा रस्ता अडवतात. ह्या गोष्टी प्रत्येक विभागात पहायला मिळतील.

वैयक्तिक आकसा पायी एखाद्या शेतकऱ्याला वेठीस धरलं जातं. त्याचा ऊस जाणारा असेल त्याच वेळी शेताचा रस्ता अडवला जातो. त्यावेळेला आत मध्ये शेत असणाऱ्या शेतकऱ्याला गुडघे टेकणे शिवाय कोणताही पर्याय नसतो. कारण शेतातील उत्पादन तो वाळवून घालवू शकत नाही.

कायदेशीर मार्गाने तुम्ही रस्त्याची मागणी करायला गेल्यास त्यामध्ये देखील खूप मोठी प्रोसिजर आहे. आज बऱ्याच शेत जमिनीच्या हद्दी फिक्स नाहीत. हद्दीचे दगड ठरलेले नाहीत अशा वेळेस कलम 143 अंतर्गत सर बांधाणे रस्ता मागितल्यास जोपर्यंत शेताच्या हद्दी फिक्स होत नाहीत तोपर्यंत तहसीलदार रस्ता देऊ शकत नाहीत. सदरच्या कामात कमीत कमी तीन ते चार वर्षे लागू शकतात.

वहिवाटी नुसार चालू असलेल्या रस्त्यामध्ये कोणी अडथळा निर्माण केल्यास मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 अंतर्गत तुम्ही तहसीलदारांकडे रस्त्याची मागणी करू शकता किंवा रस्त्यातील अडथळा दूर करावा अशी मागणी करू शकता पण यावेळी देखील ज्यांनी अडथळा केला आहे ती लोक दंडगावा करून तुम्हाला रस्ता देण्यास परत नकार देतात. या कायद्यात एक्झिक्युशन ची तरतूद नसल्यामुळे तहसीलदार देखील जास्तीची मदत करू शकत नाहीत.

गेल्या सहा महिन्यापासून मी ही वरील समस्यांमधून जात आहे तरीही कायद्याच्या कचाट्यात राहून जो काही प्रयत्न करता येईल तो प्रयत्न मी करत आहे. अशा समस्या माझ्यासारख्याच बऱ्याच शेतकऱ्यांच्या देखील आहेत. यासाठी महसूल कायद्यात काही बदल अपेक्षित आहेत. रस्ता अडवल्यास तुम्ही पोलिसांकडे मागणी किंवा तक्रार ही करू शकत नाही कारण हा मॅटर महसूल विभागाचा आहे असे पोलीस सांगून देतात.

वरील गोष्टीमध्ये कोणतेही शेताचा रस्ता अडवल्यास तो दखलपात्र गुन्हा ठरवून त्याच्यावर लगेच कोर्टात खटला चालवण्याची सुविधा सरकारने करावयास हवी. अशा व्यक्तींना कोर्टामध्ये आपले म्हणणे मांडण्यास सांगावे आणि त्या ठिकाणी योग्य निर्णय होऊ शकतो असे मला वाटते. असा रस्ता आडवला असल्यास तो तात्काळ तहसीलदारांनी सर्वे करून आठ दिवसाच्या आत खुला करून द्यावा नाहीतर हे घोंगडे भिजत राहिल्यास वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना या समस्येचा त्रास होऊ शकतो.

आपल्याही काही सूचना असल्यास पोस्ट खाली मांडू शकता. हे प्रश्न आपण माननीय महसूल मंत्री यांच्या पर्यंत पोहोचणार आहोत.

  • डॉ.अंकुश चोरमुले यांचा फेसबुक वॉल वरून

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची