Tuesday, January 31, 2023

राज्याचा कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या वेषात टाकली धाड!

राज्याच्या कृषी मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या दादाजी भुसे यांनी शेतकरी म्हणून वेषांतर करत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रविवारी उघडकीस आणली. मागणी करूनही कृषीमंत्र्यांना विक्रेत्यांनी युरिया खत दिले नाही. दुकानात अनागोंदी असल्याचा संशय बळावल्यानंतर शेतकरी असलेल्या कृषीमंत्र्यांनी आपले खरे रुप उघड करत कृषी अधिकाऱ्यांकरवी दुकानाची तपासणी केली असता युरियाचा मोठा साठा आढळून आला आहे. संबंधित दुकानावर कायदेशीर कारवाई केली जात असून गुणनियंत्रण निरीक्षकास सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी मटाशी बोलताना दिली.

शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. त्यात करोना व लॉकडाऊन यामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे, असे असतानाच खत खरेदी करताना शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. एका खतावर दुसरे खत वा बियाणे अशी सक्ती केली जाते तसेच युरिया जादा दराने विक्री केले जात आहे, अशा तक्रारी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे सत्यता पडताळणीसाठी कृषीमंत्री मालेगावाहून थेट औरंगाबादेत दुपारी दीड वाजता दाखल झाले. मंत्री म्हणून कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी चेहऱ्यावर पोंगटे बांधले आणि एका कार्यकर्त्यांची दुचाकी घेतली. दुचाकीवरुन ते जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील नवभारत फर्टिलायझर्स या दुकानात दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोहोचले. सर्वसामान्य शेतकऱ्याप्रमाणे त्यांनी दुकानदाराकडे युरिया खताची मागणी केली. परंतु खत उपलब्ध नसल्याचे उत्तर विक्रेत्याने दिले. किमान पाच बॅग तरी युरिया द्या, अशी विनंती कृषीमंत्र्यांनी केली. तब्बल अर्धा तास कृषीमंत्री मागणी करत होते परंतु विक्रेत्यांकडून नाही हेच उत्तर येत होते. त्यावेळी कृषीमंत्री भुसे यांनी फलकावर तर साठा असल्याचे लिहिलेले आहे, साठा रजिस्ट्रर कुठे आहे, अशी विचारणा केली असता विक्रेत्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. शेवटी दुकानात अनागोंदी आहे, हे लक्षात येताच कृषीमंत्र्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून घेतले.

आणि विक्रेते झाले हैराण
सर्वसामान्य शेतकरी म्हणून युरिया खरेदीसाठी आलेल्या भुसे यांनी कृषी अधिकारी दाखल होताच आपले खरे रुप प्रगट केले. त्यावर संबंधित दुकानदार व कर्मचारी यांना चांगलाच घाम फुटला आणि कृषी अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाली.

युरियाचा मोठा साठा
कृषी अधिकारी दाखल होताच कृषीमंत्र्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेत दुकान तसेच विक्रेत्यांच्या सातही गोडावूनची तपासणीचे निर्देश दिले. सायंकाळपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत युरियाच्या एक हजार ८६ बॅग आढळून आल्या आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची