Saturday, January 28, 2023

या प्रकारे करा सुंठाची निर्मिती

मसाल्यांची शेतीतून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळत असते. मसल्याच्या उत्पन्नातील एक पदार्थ म्हणजे आले. आल्यामध्ये औषधी गुण असल्याने अद्रकाची मागणी प्रचंड असते. आल्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करून आणि उन्हात चांगले वाळवावेत. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, सुंठ आणि आल्याचे लोणचेदेखील बनविले जाते. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. दरम्यान आज आपण सुंठ बनविण्याविषयी माहिती घेणार आहोत.

सुंठ तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत
पहिली पद्धत= सोडा खार मिश्रण पद्धत

या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी आले गड्डे सर्वप्रथम स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावेत. त्यानंतर ते आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची नंतर साल काढून घ्यावी. त्यानंतर दीड फूट ते दोन फूट आकारमानाच्या हाताने उचलेलेल्या इतक्‍या क्षमतेच्या गॅल्वनाइझ

gyalvnize जाळीच्या पिंजऱ्यामध्ये हे आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडियम हायड्रॉक्साइड 20 टक्के, 25 टक्के आणि 50 टक्के तीव्रतेचे द्रावण तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणांमध्ये कंदाने भरलेला पिंजरा 20 टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, 25 टक्के द्रावणामध्ये एक मिनीट व 50 टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक आम्लाचे द्रावण यामध्ये दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले गड्डे वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी, अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते.

सुंठ तयार करण्याची दुसरी पद्धत म्हणजे – मलबार पद्धत

पक्व झालेली आले जमिनीतून काढल्यानंतर त्यावरील माती पाण्याने धुऊन काढली जाते. स्वच्छ पाण्यामध्ये एक रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी गड्ड्यांवरील साल बांबूच्या टोकदार काडीने चिमट्याने काळजीपूर्वक खरडून काढावी. परत एकदा गड्डे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. साल काढलेले आले दोन टक्के चुन्याच्या द्रावणात काढून ते छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवली जातात. बंद खोलीत आल्याच्या गड्यांना 12 तास गंधकाची धुरी देतात. थोडक्यात, बंद खोलीत गंधक बारा तास जळत ठेवतात. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा ते सात तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात. अशा प्रकारे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये चांगले वाळविले जाते. त्यानंतर हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते.

सुंठ तयार करावयास वापरावयाचे आले
पीक परिपक्व झाल्यानंतर त्याची काढणी करावी गड्डे, कंद पूर्ण वाढलेले व निरोगी असावेत. कुजलेले, सडलेले, अपरिपक्व आले सुंठ तयार करण्यासाठी वापरू नये. तसेच झाले अधिक तंतुमय असता कामा नये. सुंठ तयार करण्यासाठी रिओ डी जानेरो, जमेका, चायना माहीम यासारख्या कमी तंतुमय असणाऱ्या जातींचा लागवडीसाठी वापर करावा. या जातीपासून उत्तम प्रतीच्या सुंठ तयार होऊन बाजारात चांगला भाव मिळतो.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची