Tuesday, January 31, 2023

मी एक पोल्ट्री व्यवसायिक बोलतोय

रासायनिक खतांच्या दररोज वाढत जाणाऱ्या किंमतींच्या बदल्यांमध्ये आपण पण आपल्या पोल्ट्री खताची स्वतंत्र विक्री व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे योग्य पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि कॉलिटी खत देण्याची.
साधारणत 2015 मध्ये मी पोल्ट्री व्यवसायामध्ये प्रवेश केला. त्यावेळी ग्रोइंग चार्ज म्हणजे जिसी होता पाच रुपये त्यानंतर आता 2021 पर्यंत त्यामध्ये फारशी आशी काय वाढ झालेली नाही. परंतु जसजशी वर्ष सरत गेली तस-तसा पोल्ट्री व्यावसायिकांचा बॅच वरील खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आमच्याकडे लेबर असतो.लेबर चे पगार वाढले, तुसाची किंमत वाढली, मेडिसिन वाढली आणि त्याच्यात ऋतुचक्र नुसार शेडचे व्यवस्थापना वरचा खर्च वाढत गेला.
उन्हाळ्यात सिलिंग, फॉगर , फॅन , स्पिंकलर आले, पत्यावर्ती पाचाट टाकावे लागले. किती हा खर्च…
हिवाळा आला म्हणून ब्रुडींगला कोळसा, गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या पावसाळ्यात पण तसेच. त्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायात मध्ये जर दोन रुपये चांगल्या पद्धतीने मिळवायचे असतील तर आपणच संघटित होऊन आपल्या व्यवसायला उर्जितावस्थेत कडे नेने गरजेचे आहे.
सन 2020 सली कोरोना आल्यानंतर पोल्ट्री व्यवसायामध्ये अनियमितता तयार झाली. जसे की वेळेवर लिफ्टींग न होणे, वेळेवर पिल्ले न येणे, कंपनीकडून मिळणारे पेमेंट उशिरा होणे अश्या अनेक समस्या निर्माण झाल्या. यावर उपाय म्हणून आपणच आपला व्यवसाय कशा पद्धतीने वृद्धिंगत करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रासायनिक खतामध्ये जेवढी गुणवत्ता आहे ना तेवढी तेवढीच किंवा कदाचित त्यापेक्षा अधिक आपल्या पोल्ट्री खतांमध्ये आहेत. पोल्ट्री खात्याला मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने सादर करतो आणि त्याची विक्री करतो यावर आपले प्रॉफिट अवलंबून राहील.
सर्वांना एकच विनंती आहे. सर्वांनी खते ट्रॅक्टरवर न देता बॅग पॅकिंग करूनच दिले तर बरे होईल तसेच बॅग साधारणता एका विशिष्ट वजनाची भरली तर योग्य राहिल निश्चित थोडा त्रास होईल बॅग भरणे त्याचे वजन घेणे परंतु मिळणारी रक्कम ही निश्चित योग्य राहील. उदा :- गाई साठी खाद्य म्हणून आपण जो मका भरडा वापरतो त्याचे वजन 45 किलो असते. आपण कुठेही फिरलो तरी आपल्याला मका भरडा ची बॅग साधारणता 45 किलो ची मिळेल. किंमत दहा-वीस रुपये कमी जास्त असू शकेल परंतु वजनाची 45 किलोचा हमी असते. त्यामुळे आपण पण सर्वांनी विचार विनिमयकरून बॅगेचे विशिष्ट वाजनमध्ये पॅकिंग करून मार्केटमध्ये विक्री करणे गरजेचे आहे. आणि त्याचा रेट पण फिक्स करून त्याच किमतीला गोनी विकणे गरजेचे आहे.

समाजाच्या दृष्टीने आपण फार थोडे पोल्ट्री व्यावसायिक आहोत. प्रत्येक गावानुसार , तालुक्या नुसार आपण फार थोडे आहोत. अजून 10% कस्टमर वाढली तर आपण त्यांना सर्व मिळून जरी एकत्र आलो तर खत पुरवठा मागणी तेवढा करू शकत नाही..

आज रासायनिक खतांच्या किंमतीमुळे किंवा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देताना शेतकरीवर्ग सुद्धा पोल्ट्री खताची मागणी मोठ्या प्रमाणात करत आहे अशा वेळी आपण योग्य वजन योग्य किंमत यानुसार जर विक्री व्यवस्था उभी केली तर आपली एक पण बॅग शिल्लक राहणार नाही. आणि पोल्ट्री व्यावसायिकाला पण दोन रुपये चांगले मिळतील. कंपनीकडून जर ग्रोईंग चार्ज वाढत नसेल तर आपण आपल्या व्यवसायिक दृष्टीने किंवा अभ्यासाने आपला स्वतःचा उत्पन्नाचा बेस वाढवणे गरजेचे आहे. त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. सध्या कोरोना काळामध्ये बऱ्यापैकी फार्मर निवांत असतील या विषयावरती सर्वांनी सर्वांचे मत मांडणे गरजेचे आहे. आणि योग्य वजन आणि योग्य किंमत ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि ती काळाची गरज पण आहे. आपण आपल्याला ओळखा आपल्या खात्याची शक्ती ओळखा आणि एक स्वतंत्र विक्री व्यवस्था उभी करा जास्त काही नाही परंतु एका विभागानुसार एका गावानुसार एखाद्या पंचक्रोशी नुसार तेवढ्या पोल्ट्री व्यावसायिकांनी सारखे सारखे वजन सारखी किंमत ठरून त्याच नियमानुसार विक्री करावी. ही किमान अपेक्षा आहे. यावर आपले मत जरूर मांडा मी फक्त माझे मत व्यक्त करतोय यात काही चुका असल्यास क्षमस्व..

पोल्ट्री व्यावसायिक, जितेश साबळे 8453838888 7588 07 7588

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची