हवामान खात्याने दिलेला मान्सूनचा २१ मेचा अंदाज खरा ठरला आहे. शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. आजही अंदमानमध्ये पावसाचे काळे ढग घोंघावत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
येत्या ३ ते ४ दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
१ जून रोजी केरळात मान्सून दाखल होणार आहे. सध्या मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान निर्मिती झाली असल्याची माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
Source : Agromet Advisory Service from www.imd.gov.in
-प्रितम पाटील