Friday, August 12, 2022

बॅरेजेस व तालुक्यातील विकासासाठी सत्तेसोबत राहण्याचा निर्णय : संजयमामा शिंदे.

करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील दहिगाव,कुकडीचा पाणीप्रश्नाबरोबरच रोजगारी चा मोठा प्रश्न असून त्यासाठी औदयोगिक(MIDC) विकास इतर विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी, जिल्ह्यातील उजनी धरणावरचा ताण हलका करण्यासाठी भीमा व सीना नदीवर बॅरेजेस होणे आवश्यक आहे. हे प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. सध्याची राजकिय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी चे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्यास नकार दिला असून जनतेचा कौल मान्य करून विरोधी बाकावर बसण्याचे ठरविले आहे.त्यामुळे भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेसोबत राहून विकासाची कामे मार्गी लागणार आहेत.करमाळा विधानसभा मतदारसंघात जगताप व साठे गटाने पाठिंबा देताना सत्तेसोबत राहण्याचे अट होती,त्याच बरोबर तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळीशी चर्चा करुन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

  • संजयमामा शिंदे
  • (आमदार करमाळा)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची