Saturday, October 1, 2022

बियाण्यापासून उसाची जात विकसित करण्यासाठी ऊस संशोधन केंद्र प्रयत्नशील

महाराष्ट्रात प्रामुख्याने दक्षिण भागात काही ठिकाणी उसाच्या काही जातींना नोव्हेंबर महिन्यात तुरा येतो.
तुरा आल्यावर ऊसाची वाढ खुंटते. आणि म्हणून आपण तुरा न येणाऱ्या किंवा तुरा कमी येणाऱ्या जातींची निवड करतो.

पण उसाला तुरा येणे किती महत्त्वाचे आहे ते आज आपण बघूया.

ऊस पिकात एका रोपाच्या भागापासून सारख्या जनूकविधेची अनेक रोपे मिळतात. त्यांना कृतिका (क्लोन)म्हणतात. चांगल्या कृतीकेची निवड करून त्यांची शुद्धता राखून अशा पिकात सुधारणा करता येते. परंतु नवीन जाती निर्माण करण्यासाठी दोन इच्छित वाणाचा संकर करणे गरजेजे असते.
अश्याप्रकारे संकर केल्याने नवीन जनुकविधा मिळतात आणि त्यापासून ऐच्छिक गुणधर्म निवडून नवीन जात तयार केली जाते. आणि संकर करण्यासाठी फुलोरा येणे महत्त्वाचे असतं.

विशिष्ट प्रकारच्या वातावरणामुळे कोईमतूर हे भारतातील एकमेव असे ठिकाण आहे. ज्याठिकाणी ऊसाला चांगल्याप्रकारे फुलोरा / तुरे आणि त्यापासून भरपूर प्रमाणात बियाणं येत.
याच अनुषंगाने
National Hybridization garden and fluff supply programme.
हा प्रोग्रॅम कोईमतूर येथे 1974 साली चालू करण्यात आला.

काय आहे हा प्रोग्रॅम ?

भारतातील एकूण २४ राज्यात ऊस संशोधन केंद्र आहेत पण काही ठिकाणी पाहिजे तसा उसाला तुरा येत नाही आणि तुरा आलाही तरी त्यापासुन बियाणं मिळत नाही.

म्हणून सर्व राज्यातील संशोधन केंद्र यांना ऊस पिकावर संशोधन आणि संकर करण्यासाठी हा प्रोग्रॅम वातावरणाचा अभ्यास करून अश्या योग्य ठिकाणी चालू करण्यात आला.

या सर्व २४ राज्यातील संशोधन केंद्र मधून दरवर्षी Sugarcane breeders म्हणजे ऊस रोप पैदासकार कोईमतूर याठिकाणी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत भेट देऊन आपआपल्या पद्धतीने ऊसाचे संकर करतात.

संपूर्ण भारतातील ऊस पीक पैदासकार यांना एकाच जागेवर संशोधन आणि ऊसाचे संकरिकरण करण्यासाठी. याठिकाणी एक सार्वजनिक प्लॉट मध्ये
भारतातील वेगवेगळ्या ऊस संशोधन करणाऱ्या संशोधन संस्था आणि केंद्र यांच्या शिफारशी ने वेगवेगळ्या ऊसाच्या जातींची लागवड त्या ठिकाणी केली जाते.

उसाला फुलोरा म्हणजे तुरे कधी येतील या हिशोबाने ज्या त्या संशोधन केंद्र ला माहिती दिली जाते आणि
ज्या त्या संशोधन केंद्र चे पैदासकार त्या ठिकाणी उसाचे संकर करण्यासाठी येतात.

त्यांना तिथं सर्व प्रकारची मदत करण्यात येते.
त्यानंतर
ज्या त्या संशोधन केंद्र ला त्यांनी केलेल्या संकर चे बियाणं व्यवस्थित काढून पाठवून दिले जाते.

असे वर्षाला एकूण जवळपास 600 ऊसाच्या वेगवेगळ्या जाती याठिकाणी लागवड आणि संगोपन केल्या जातात.

कोरोना च्या प्रादुर्भाव असल्याने यंदा सर्व पैदासकार यांना याठिकाणी स्वतः भेट देऊन संकर करता येणार नसल्याने.
कोईमतूर संशोधन केंद्र यांनी स्वतः संकर करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
आणि बियाणं ज्या त्या संशोधन केंद्र ला पाठवण्यात येईल असे सांगितले आहे.

माहिती स्रोत आणि फोटो:- ऊस संशोधन संस्था कोईमतूर.

या प्रोग्रॅम च्या माध्यमातून आतापर्यंत संपूर्ण भारतात अनेक उसाच्या जाती तयार करण्यात आलेल्या आहेत.
त्यापैकी महाराष्ट्र मध्ये
CoM 7125, CoM 88121, CoM 0265
या जाती तयार करण्यात आल्या आहेत.

✍️ गणेश सहाने.
(प्रबंधक होय आम्ही शेतकरी समूह)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची