पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना १ डिसेंबर २०१८ पासून देशात लागू करण्यात आली. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत योग्य शेतकर्यांना प्रत्येक वर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेचे सहा हजार रुपये मिळाले नाही तर काही हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि आपले सहा हजार रुपये मिळवू शकता.
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना १ डिसेंबर २०१८ पासून देशात लागू करण्यात आली. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये देणार आहे.
कशाप्रकारे मिळणार योजनेचा पैसा…
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत सहा हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.
हे आहे संकेतस्थळ https://www.pmkisan.gov.in/
जे कोणी नवीन नोंदणी करणार आहेत. त्यांनी भारत सरकारचे संकेतस्थळ वर जाऊन नोंदणी करू शकता. आणि त्या संदर्भांत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या संकेतसथळावर पाहू शकता. या संकेतसथळावर क्लिक करुन मेन्यू मध्ये जावून फार्मर कॉर्नरवर जावे. लाभार्थी सूचीच्या लिंकवर क्लिक करावी. आपली माहिती भरावी. यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळेल.
याव्यतिरिक या योजनेसाठी सरकारने काही हेल्पलाइन नंबर दिले आहेत, ज्याअंतर्गत तुम्ही थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क करू शकता
पहा कोणते आहेत ते हेल्पलाईन नंबर…
- PM-KISAN हेल्पलाइन नंबर – 011-24300606
- पीएम किसान टोल फ्री नंबर – 18001155266
- पीएम किसान हेल्पलाइन नंबर – 155261
- पीएम किसान लँडलाइन नंबर्स – 011-23381092
अनेक वेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत पैसे जमा होत नाहीत, त्यामुळे हे सर्व नंबर प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहेत.