Thursday, June 30, 2022

नोकरी सोडून जैविक शेतीद्वारे लाखोंची कमाई करणारे संगलीचे सचिन येवले”

सांगलीतील पडवळवाडी या गावी राहणारे सचिन येवले व पत्नी वर्षां येवले हे जैविक शेती व त्यापासून उत्पादने बनवून एक आदर्श निर्माण करत आहेत. आपल्या २.५ एकर जमिनीवर ऊस, डाळी, मोसमी भाज्या, फळे व औषधी वनस्पती या सर्वांची ते लागवड करत असून यापासून विविध प्रकारचे उत्पादने देखील बनवत आहेत. उसापासून जैविक गूळ, मसाला गूळ, गुळाची साखर, लॉलीपॉप व कँडी यासारखी उत्पादने बनवतात. या सर्व खाद्य पदार्थाना ग्राहकांना पोहचवण्यासाठी सचिन येवले यांनी ‘कृषीदूत ऍग्रो फार्म’ या नावाने आपला ब्रँड रजिस्टर केला आहे.

सचिन व वर्षां या जोडप्याचे ऍग्रीकल्चर झाले असून दोघांनाही शेतीचे ज्ञान आहे. शेती करण्याअगोदर सचिन नोकरी करत होते परंतु जेव्हा आपण घेतलेले शिक्षण शेतकऱ्यांच्या उपयोगी येत नसल्याचे त्यांच्या लक्षात तेव्हा त्यांनी नोकरी सोडली व आपल्या २.५ एकर जमिनीवरती २०१३ मध्ये शेती करण्यास सुरवात केली. सचिन यांचे वडील रासायनिक पद्धतीने शेती करत परंतु जेव्हा सचिन यांनी शेतीला सुरवात केली तेव्हा मात्र त्यांनी जैविक शेती करण्यास सुरवात आहे.साताऱ्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.सचिन यांनी उसाबरोबर दुसऱ्या पिकांची लागवड देखील जैविक पद्धतीने केली आहे.सुरवातीला २-३ वर्षे उत्पादन कमी निघाले तेव्हा लोकांनी सचिन यांना नावे ठेवली परंतु सचिन यांनी लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष्य केंद्रित केले.

३ वर्षाच्या मेहनतीनंतर सचिन यांच्या मेहनतीला यश आले. सचिन पिके घेताना मिश्रित पद्धतीने घेत असून जुनमध्ये ऊस लागवडीबरोबर भुईमूग, डाळी, भाज्या देखील पिकवतात. याव्यतिरिक्त सचिन यांच्याकडे पेरूचा बगीचा असून जिथे झाडांच्या मधोमध भुईमूग व भाज्या पिकवल्या जातात.मोसमी भाज्यांव्यतिरिक्त सचिन शेवगा, लेमनग्रास यासारखी पिके देखील घेतात.सचिन ही सर्व पिके जैविक पद्धतीने घेत असून खत म्हणून शेण, जीवामृत व वर्मीकंपोस्टचा देखील वापर करतात.जैविक खते वापरण्याबरोबरच सचिन जैविक कीटकनाशकांचा देखील वापर करतात.सचिन यांच्या यशात त्यांच्या पत्नी वर्षा यांचा बरोबरीचा वाटा असल्याचे ते सांगतात.या जोडप्याने मिळून प्रोसेसिंग करण्याचा मोठा निर्णय घेतला व आपल्या ब्रँडचे नाव रजिस्टर करून घेतले.

उसापासून मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनवले जातात त्यामध्ये साधा गूळ, विलायची, बडीशेप, आले टाकून बनवलेला मसाला गूळ, त्याचबरोबर गूळ कँडी व लॉलीपॉप यासारखे अनेक पदार्थ बनवले जातात.गुळापासून बनवलेल्या साखरेला भरपूर मागणी असल्याचे सचिन सांगतात.पुणे, पणजी अशा अनेक ठिकाणी सचिन यांचा माल विक्री होतो.एवढ्यावर सचिन व वर्षा थांबले नसून त्यांनी पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या चहाचे एक दुकान टाकले आहे जिथे चहा बनवण्यासाठी साखर, चहापावडर व दुधाची गरज नसते गरज असते ती केवळ लेमनग्रास, आले, विलायची व काही जडीबुटींची.

या चहाला देखील भरपूर मागणी असल्याचे सचिन सांगतात.आज सचिन व वर्षां ‘आत्मा’ या संस्थेअंतर्गत २ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत असून अनेक शेतकऱ्यांना एकत्रित जोडण्याचे काम ते करत आहेत.सचिन व वर्षा यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.जिथे अनेक लोक खेड्याकडून शहरांत येतात तिथे सचिन व वर्षा यांच्यासारखे जोडपे एक आदर्श निर्माण करतात.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची