नुकतेच अरबी समुद्रात येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातच्या किनारपट्टीवर मोठे नुकसान केले आहे. हे वादळ शमते तोवर आणखी एक वादळ भारताच्या उंभरठ्यावर येऊन ठेपले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच दिलेल्या माहितीनुसार उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व मध्य खाडीमध्ये २२ मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. आणि परिणामी याचे रुपांतर मोठ्या प्रलयकारी वादळात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. बुधवारी IMD ने ही माहिती दिली आहे. हवामान विज्ञान विभागाचे क्षेत्रिय निर्देशक जी के दास यांनी म्हटले आहे की, वायव्येकडे हे वादळ सरकू शकते. २६ मे रोजी सायंकाळपर्यंत हे प.बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकू शकतं. यावेळी वाऱ्याचा वेग अतिशय तीव्र असण्याची शक्यता आहे.
२२ मे रोजी तयार होणारा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे साधारणपणे ३ दिवसाच्या कालावधीत चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते. पश्चिम तटावर २५ मे पासून मध्यम ते अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु २६ मे रोजी वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.या चक्रीवादळाचे नाव “यास” (Yaas) असे असणार आहे.
नुकत्याच येऊन गेलेल्या, तौक्ते चक्रीवादळातून भारताचा पश्चिम किणारा सावरतोय तोपर्यंत पुर्वेला आणखी एक वादळ निर्माण होतोय.
-प्रितम प्रकाश पाटील, एम.एस्सी. (कृषी हवामानशास्त्र), विद्यार्थी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी